

'मी लता दीनानाथ' या कार्यक्रमातून पं. हृदयनाथ मंगेशकर दीदींच्या (लता मंगेशकर) अजरामर गाण्यांसोबत त्यांच्या आठवणींना उजाळा देतील.
Sakal
पुणे : दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान आणि हृदयेश आर्टस् यांच्यातर्फे आयोजित दीनानाथ मंगेशकर पुरस्कार वितरण सोहळा आणि ‘मी लता दीनानाथ’ सांगीतिक मैफील’, असा कार्यक्रम २४ एप्रिलला सायंकाळी पाच ते रात्री १० या वेळेत स्वारगेटच्या गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीला सुरुवात झाली आहे.