विरोधी पक्षनेतेपदासाठी दीपाली धुमाळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

 महापालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने नगरसेविका दीपाली धुमाळ यांच्या नावाची शुक्रवारी घोषणा केली. या पदाच्या नेमणुकीची अधिकृत प्रक्रिया पूर्ण करून पुढील चार दिवसांत धुमाळ पदभार स्वीकारणार आहेत. महापालिकेच्या राजकारणाच्या इतिहासात धुमाळ यांच्यानिमित्ताने दुसऱ्यांदा महिलेकडे विरोधी पक्षनेतेपद आले आहे.

पुणे - महापालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने नगरसेविका दीपाली धुमाळ यांच्या नावाची शुक्रवारी घोषणा केली. या पदाच्या नेमणुकीची अधिकृत प्रक्रिया पूर्ण करून पुढील चार दिवसांत धुमाळ पदभार स्वीकारणार आहेत. महापालिकेच्या राजकारणाच्या इतिहासात धुमाळ यांच्यानिमित्ताने दुसऱ्यांदा महिलेकडे विरोधी पक्षनेतेपद आले आहे. ‘महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर वचक निर्माण करतानाच पुणेकरांच्या प्राधान्यक्रम पुढे नेण्याचा  प्रयत्न असेल,’ असे धुमाळ यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांची मुदत संपल्याने राष्ट्रवादीकडून नव्या विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यात आली.

लोणकर यांना अश्रू अनावर
याआधी महापौर, स्थायी समिती आणि आता विरोधी पक्ष नेतेपदाची तिसरीही संधी हुकल्याने या पदाच्या दावेदार नगरसेविका नंदा लोणकर यांना अश्रू अनावर झाले. नेतृत्वाने डावलल्याने लोणकर नाराज झाल्या आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deepali Dhumal as Leader of Opposition party in PMC