'...म्हणून होऊ नका झोमॅटो गोल्डमधून लॉग आऊट'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

मुस्लीम व्यक्तीच्या हातून मला खाद्य पदार्थ पाठवू नका, अशी मागणी एका ग्राहकाने केली असता, तरुण उद्योजक असलेल्या गोयल यांनी खाद्यपदार्थांना धर्म नसतो, असे ट्‌विट केले होते. सोशल मिडीयावर त्याचे मोठ्या प्रमाणावर स्वागत झाले होते.

पुणे : ग्राहकांना किफायशीर दरात खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत आणि त्यातून हॉटेल व्यावसायिकांचाही फायदा व्हावा, हाच झोमॅटो गोल्डचा प्रामाणिक उद्देश आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी झोमॅटो गोल्डमधून लॉग ऑऊट होऊ नये, असे झोमॅटोचे कार्यकारी संचालक दिपिंदर गोयल यांनी ट्‌विटरवरून केले आहे.

हॉटेल व्यावसायिकांनी झोमॅटो गोल्डमधून लॉग ऑऊट करण्यास सुरवात केली आहे. त्या बाबतचे वृत्त सकाळमध्ये प्रसिद्ध झाले. या बाबत "झोमॅटो गोल्ड'ची बाजू विचारण्यासाठी सकाळने त्यांना ट्‌विट केले असता, गोयल यांनी झोमॅटोची बाजू विस्तृत मांडली. गोयल म्हणाले, "ग्राहकांना स्वस्तात खाद्यपदार्थ मिळावेत, अशी भूमिका आहे. ग्राहकांची संख्या वाढली तर हॉटेल व्यवसायाचाच फायदा होणार आहे. ग्राहक आणि हॉटेल व्यावसायिक, या दोन्ही घटकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न आहे. झोमॅटोच्या नियोजनानुसार काही गोष्टी झाल्या नाहीत. त्यामुळे काही लोकांना त्रास झाला. परंतु, आम्ही त्यात तातडीने बदल केले आहेत आणि या पुढेही करणार आहोत.''

खाद्यपदार्थांची ऑर्डर केल्यावर, त्यासाठीचा भारत आणि चीनमधील खर्च सारखाच आहे. परंतु, चीनमधील दरडोई उत्पन्न भारतीयांच्या चौपट आहे. त्यामुळे आपल्या देशातील ग्राहकांनाही अजून किफायतशीर दरात खाद्य पदार्थ मिळवून देणे शक्‍य आहे अन्‌ झोमॅटोचा तोच प्रयत्न आहे. हॉटेल व्यावसायिकांनी त्यांची ऑपरेशनल कॉस्ट कमी केली तर, ते नक्कीच शक्‍य आहे, असेही गोयल यांनी स्पष्ट केले आहे.

मुस्लीम व्यक्तीच्या हातून मला खाद्य पदार्थ पाठवू नका, अशी मागणी एका ग्राहकाने केली असता, तरुण उद्योजक असलेल्या गोयल यांनी खाद्यपदार्थांना धर्म नसतो, असे ट्‌विट केले होते. सोशल मिडीयावर त्याचे मोठ्या प्रमाणावर स्वागत झाले होते.

संबंधित बातमी :
ग्राहकांच्या ड्रिंक्‍स अऩ् जेवणाच्या जुगाडामुळे झोमॅटो डब्यात...!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deepinder Goyal statement on Zomato gold