बारामतीत झालेल्या टी 20 सामन्यात शिरुरकडून पुण्याचा धुव्वा

मिलिंद संगई
Wednesday, 20 January 2021

शिरुरचा महाराष्ट्राच्या संघातील अष्टपैलू खेळाडू सम्यक जगताप याने एकीकडे 20 चेंडूत 50 धावा कुटल्या तर दुसरीकडे चार षटकात चार धावांच्या मोबदल्यात पुण्याच्या तीन फलंदाजांना तंबूत धाडले. 

बारामती : येथील धीरज जाधव क्रिकेट अकादमीच्या वतीने आयोजित सोळा वर्षांखालील टी 20 क्रिकेट सामन्यात शिरुरच्या संघाने पुण्याच्या संघाचा दहा गडी राखून दणदणीत पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

शिरुरचा महाराष्ट्राच्या संघातील अष्टपैलू खेळाडू सम्यक जगताप याने एकीकडे 20 चेंडूत 50 धावा कुटल्या तर दुसरीकडे चार षटकात चार धावांच्या मोबदल्यात पुण्याच्या तीन फलंदाजांना तंबूत धाडले. 

बारामतीत झालेल्या या स्पर्धेत पुणे, मुंबई, शिरुर, सातारा, सांगली, पंढरपूर, नगर येथील संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातील शिरुरचा सम्यक जगताप, धुळ्याचा सचिन धस, संगमनेरचा अनिकेत कवडे, अकलूजचा अमित निंबाळकर या खेळाडूंनी आपला नेत्रदीपक खेळ दाखविला. 
अंतिम सामन्यात शिरुरने पुण्याला पार निष्प्रभ केले. पुण्याने दिलेले सर्व बाद 64 धावांचे आव्हान शिरुरने अवघ्या पाच षटकात ओलांडून विजय साजरा केला. 

महिलांचे क्रिकेट सामने..
येथील अकादमीच्या वतीने येत्या 28 जानेवारीपासून बारामतीत महिलांच्या टी 20 क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 1971 नंतर बारामतीत प्रथमच महिलांच्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती धीरज जाधव यांनी दिली. 

धनंजय मुंडे Genuine माणूस, पक्ष योग्य निर्णय घेईल : रोहित पवार

येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडर स्टेडीयमवर 28 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान हे सामने होणार आहेत. लेदर बॉलवर होणा-या या सामन्यांमध्ये मुंबईच्या सेंट्रल रेल्वेच्या संघासह विदर्भाचा महिलांचा रणजी संघ, पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे महिलांचे दोन संघ, आंध्रप्रदेश, पंढरपूर, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातूनही संघ सहभागी होणार आहेत. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

दरम्यान, जाधव हे बारामतीतूनही महिलांचा एक स्थानिक संघ या सामन्यात उतरविणार आहेत. भारतीय क्रिकेट संघात खेळलेल्या अनुजा पाटील व पूनम राऊत या दोघी या सामन्यात खेळणार आहेत. 

(संपादन : सागर डी. शेलार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: defeat of pune team by shirur team