पुण्याच्या लोहगाव विमानतळाच्या धावपट्टी विस्तारासाठी संरक्षण मंत्र्यांना साकडं | Pune Lohgaon Airport | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lohgaon airport
पुण्याच्या लोहगाव विमानतळाच्या धावपट्टी विस्तारासाठी संरक्षण मंत्र्यांना साकडं

पुण्याच्या लोहगाव विमानतळाच्या धावपट्टी विस्तारासाठी संरक्षण मंत्र्यांना साकडं

पुणे - कार्गोसाठीची मोठी विमाने (Big Plane) आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवरील (International Route) विमानांच्या उड्डाणांसाठी लोहगाव विमानतळाची (Lohgaon Airport) धावपट्टी वाढविण्यात यावी, या मागणीसाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲंड ॲग्रीकल्चरचे शिष्टमंडळ संरक्षण मंत्री राजनाथसिंह (Rajnath Singh) यांना साकडं घालणार आहेत.

लोहगाव विमातळाच्या धावपट्टीची लांबी सध्या २५५३ मीटर आहे. कार्गोसाठीची मोठी विमाने आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवरील विमानासाठी ही धावपट्टी अपुरी असल्यामुळे ती विमाने यावर उतरू शकत नाही. त्यामुळे या धावपट्टीची लांबी किमान एक हजार मीटरने वाढविण्याची मागणी तज्ज्ञांकडून होत आहे. लोहगाव विमानतळ हवाई दलाचा आहे. त्यांच्याकडून आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) या बाबत एकमत होत नसल्यामुळे धावपट्टी विस्तारीकरणाचा प्रश्न गेल्या १८ वर्षांपासून प्रलंबित आहे.

हेही वाचा: पुणे शहरात गुरुवारी एकाच दिवसात २ हजार २८४ नवे कोरोना रुग्ण

चेंबरने या बाबत केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हवाई दलाने परवानगी दिल्यास धावपट्टीची लांबी वाढविण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता संरक्षण मंत्र्यांशीच अल्पावधीत चर्चा करून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न असेल, असे चेंबरचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी नमूद केले.

लोहगाव विमानतळावरील कार्गोची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. या विमानतळावरून जून २०१७ पासून कार्गोद्वारे वाहतूक सुरू आहे. त्याची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. परंतु, त्यासाठी भूखंडाची आवश्यकता आहे. तो मिळाल्यावर सहा महिन्यांत कार्गो टर्मिनलची इमारत उभारण्यात येईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Rajnath SinghpuneAirport
loading image
go to top