
देहूमध्ये मांस-मच्छी-अंडी विक्रीला बंदी; नगरपरिषदेचा निर्णय आजपासून अंमलात
देहू: संत तुकारामांचे जन्मस्थान असलेल्या देहूमध्ये आजपासून पुन्हा एकदा मांस आणि मासे विक्रीला बंदी करण्यात आली आहे. हा निर्णय नगरपरिषदेच्या वतीने घेण्यात आला आहे. नवनिर्मित देहू नगरपरिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला असून आजपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
याआधी ग्रामपंचायतीने सुद्धा हा निर्णय घेतला होता. मात्र, ग्रामपंचायत बरखास्त झाली आणि त्यानंतर कोरोनाची साथ सुरु झाली. त्यामुळे गेली दोन वर्षे हा निर्णय बारगळलेल्या अवस्थेतच राहिला होता. प्रशासक असताना मांसविक्री पुन्हा एकदा सुरु झाली होती. त्यानंतर आता नगरपरिषद स्थापित झाल्यानंतर हा बंदीचा निर्णय पुन्हा घेण्यात आला आहे.
मांस-मच्छी आणि अंडीविक्रीला बंदी घालण्यात आली आहे. अनेक भाविक या ठिकाणी शाकाहार करण्यावर भर देतात. या पवित्र स्थळाचा विचार करता एकमुखाने हा निर्णय घेण्यात आला होता. तोच निर्णय आता पुन्हा एकदा घेतला गेला आहे.
Web Title: Dehu Ban On Sale Of Meat Fish Eggs In Dehu Municipal Council Decisions In Effect From Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..