उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

देहू - जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर देहूरोड येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या पुलावर डांबरीकरण आणि पथदिवे बसविण्याचे काम सुरू आहे.

पुणे- मुंबई महामार्गावर निगडी ते देहूरोडदरम्यान रुंदीकरण आणि नवीन उड्डाण पुलाचे काम गेल्या वर्षी सुरू करण्यात आले. यात दोन ठेकेदारांना कामे देण्यात आली. त्यातील उड्डाण पुलाचे काम टी ॲण्ड टी कंपनीतर्फे करण्यात येत आहे. 

याबाबत कंपनीचे सल्लागार कुमार वाडिया म्हणाले, ‘‘पुलाची लांबी सहाशे मीटर आहे. या कामासाठी शासनाने ३४ कोटी रुपये दिले असून, सध्या या पुलावर डांबरीकरण सुरू आहे. दिशादर्शक फलक लावणे, सुरक्षा फलक लावणे, पथदिव्यांचे कामही हाती घेण्यात आले आहे. येत्या डिसेंबरअखेरपर्यंत ही सर्व कामे पूर्ण होतील. 

रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला मंजुरी याच पुलाला लागून पुणे- मुंबई लोहमार्गावर आणखी एक उड्डाण पूल होणार आहे. या पुलाचे कामही सुरू झाले आहे. त्याला रेल्वे विभागाकडून मंजुरी मिळाली आहे.

Web Title: Dehurod flyover work on the old Pune-Mumbai highway in the last phase