टेंडर निघालं अन् गोखलेनगर परिसरात नालेसफाई सुरु झाली पण...

समाधान काटे
शनिवार, 27 जून 2020

दिवसेंदिवस नालेसफाईचा प्रश्न ऐरणीवर येत असून, आता नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत गोखलेनगर, जनवाडी, जनता वसाहत, वडारवाडी आदी परिसर येतो. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होणे गरजेचे असताना देखील, वरील परिसरातील नालेसफाई अजून झालेली नाही.

गोखलेनगर (पुणे) : दिवसेंदिवस नालेसफाईचा प्रश्न ऐरणीवर येत असून, आता नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत गोखलेनगर, जनवाडी, जनता वसाहत, वडारवाडी आदी परिसर येतो. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होणे गरजेचे असताना देखील, वरील परिसरातील नालेसफाई अजून झालेली नाही. यावर्षी नालेसफाईसाठी शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत ५० लाख रूपयांची निविदा काढून संबंधित ठेकेदाराला टेंडर देण्यात आले आहे.

'शरद पवारांबाबतच्या 'त्या' वक्तव्यावरून गोपीचंद पडळकर यांनी तात्काळ माफी मागावी'​

नागरिकांच्या कररूपी पैशातून पालिका प्रशासन ही कामे दरवर्षी करत असते. वेळेपूर्वी नालेसफाई न झाल्याने पावसाळ्यात नाल्यांमध्ये पाणी साठून नागरिकांच्या घरात पाणी शिरते. पालिका प्रशासन मात्र बेजबाबदारपणे वागत असल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही नाले सफाई होत नसल्याने, गोखलेनगर, जनवाडी येथील शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रविण डोंगरे तसेच म्हाळूपार्वती प्रतिष्ठानचे संस्थापक निलेश प्रकाश निकम यांनी निवेदनाद्वारे पालिका प्रशासनास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"मागील अनेक दिवसांपासून गोखलेनगर, जनवाडी येथे नालेसफाईचे काम झाले नाही. तसेच सदर नाल्यांमध्ये अनेक मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकण्यात आला आहे. त्यामुळे सदर नाल्यातील घाण सांडपाणी बाहेर येऊन आजूबाजूच्या परिसरात पसरून दुर्गंधी व आजार पसरायची दाट शक्यता आहे. आधीच कोरोनाचा प्रादुर्भाव हा जनवाडी, गोखलेनगर भागात वाढत आहे. त्यामुळे नागरिक भयभीत असताना नाल्यांची साफसफाई झाली नाही. व त्यातील सांडपाण्यामुळे व कचऱ्यामुळे आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. नाल्याची लवकर सफाई केला नाही तर सोमवारी तीव्र आंदोलन करणार आहोत"
  - निलेश प्रकाश निकम, संस्थापक अध्यक्ष, म्हाळूपार्वती प्रतिष्ठान

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

"दरवर्षी ही गटार ( नाला ) पावसाळ्या आधी साफ करतात. परंतु अनेकदा तक्रार करुन देखील नाला साफ झाला नाही. पुणे महापालिका ठेकेदाराचे काम अत्यंत संथ गतीने चालू आहे. नाल्याची सफाई वरवर केली जात असून नाल्यात साचलेली घाण नाल्यालगतच टाकली जात आहे. त्यामुळे पाऊस सुरु झाला की सदर घाण परत नाल्यातच जाते त्यामुळे नाला पुन्हा तुंबून नागरिकांच्या घरात घाण पाणी शिरते व त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो. सदर नाला दोन दिवसात साफ न झाल्यास सदर परिसरातील नागरीकांच्या द्वारे आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे"
     - प्रविण  डोंगरे, शिवसेना विभाग प्रमुख शिवाजीनगर

 

 

"नालेसफाईसाठी शिवाजी नगर- घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत ५० लाख रुपयाचे टेंडर असून, संबंधित ठेकेदार नालेसफाई करत आहे. कंटेनमेंट झोन असल्यामुळे नालेसफाईला वेळ लागत आहे. अजून १० ते १५  दिवस लागतील".
 - नाथा चव्हाण , उपअभियंता महापालिका पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delay in cleaning of nallas in Gokhalenagar area