पुणे - शहरात सायबर चोरट्यांकडून दररोज कुणाला तरी मोबाइलवर संदेश येतो, आणि त्या व्यक्तीचे बँक खाते रिकामे होते. शेअर बाजारात चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून ६६ वर्षीय नागरिकाला १३ लाखांना गंडविण्यात आले..ऑनलाइन टास्क, डिजिटल अरेस्ट अशा सायबर गुन्ह्यांची व्याप्ती वाढत असून, दररोज नागरिकांची लाखोंची फसवणूक होत आहे. परंतु प्रशिक्षित आणि पुरेशा मनुष्यबळाअभावी अनेक गुन्ह्यांचा तपास शेवटपर्यंत पोचत नाही. पुण्यासाठी पाच सायबर पोलिस ठाण्यांचा प्रस्तावही गृह विभागाकडे प्रलंबित आहे..सायबर चोरट्यांकडून दररोज लाखोंना गंडा -शेअर बाजारात चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी नारायण पेठेतील एका ज्येष्ठ व्यक्तीची १३ लाख रुपयांची फसवणूक केली. या व्यक्तीने १९ जून रोजी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. चोरी, घरफोड्या अशा गुन्ह्यांच्या तुलनेत सध्या सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे..शेअर बाजारात चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक, ऑनलाइन टास्क, डिजिटल अरेस्ट, व्हर्च्युअल सेक्सटॉर्शन, बँक फिशिंग, फेक लोन अॅप्ससारख्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. बहुतांश नागरिक तक्रार करण्यास धजावत नाहीत, त्यामुळे अनेक सायबर गुन्ह्यांची नोंदही होत नाही..सायबर पोलिस ठाण्यांचा विस्तार अपरिहार्य -सध्या एकमेव सायबर पोलिस ठाणे संपूर्ण शहरासाठी अपुरे ठरत आहे. इतर पोलिस ठाण्याकडूनही सायबर गुन्ह्यांचा तपास केला जातो. परंतु तपास पुढे सरकत नाही. शहरातील वाढती लोकसंख्या, आयटी हबचा विस्तार, शिक्षण व औद्योगिक वसाहती यामुळे नागरिकांचा ऑनलाइन व्यवहारांवरील अवलंब वाढला आहे. त्यामुळे प्रत्येक परिमंडळात स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे असणे गरजेचे बनले आहे..गृह विभागाकडे प्रस्ताव -पुणे शहर पोलिस आयुक्तालयाने पाच नवीन सायबर पोलिस ठाण्यांचा प्रस्ताव गृह विभागाकडे सादर केला आहे. यासह अत्याधुनिक सायबर प्रयोगशाळा उभारण्याचीही मागणी केली आहे. या प्रयोगशाळांमुळे डिजिटल पुरावे गोळा करणे, डेटा विश्लेषण करणे अशा बाबींना गती मिळणार आहे.मुंबईत डिजिटल फॉरेन्सिक, डेटा विश्लेषण व रिअल टाईम ट्रॅकिंग सुविधा असलेली सायबर लॅब उभारली जात आहे. पुण्यातही अशा स्वरुपाची सुसज्ज सायबर लॅब उभारण्यासह प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची गरज आहे..फसवणुकीच्या घटनांत वाढ -- कोथरूडमधील ज्येष्ठ महिलेची डिजिटल अरेस्टच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक- शहरात अशाच प्रकारे अन्य एका व्यक्तीकडून चार कोटी रुपये लुबाडले- व्हॉटसॲप, टेलिग्रामद्वारे बनावट गुंतवणूक सल्लागारांकडून लाखोंची फसवणूक- ऑनलाइन टास्कच्या नावाखाली लाखोंना गंडा.सायबर पोलिस ठाण्यात दाखल गुन्हे -फसवणूक प्रकार- २०२३- २०२४शेअर ट्रेडिंग- ६- १३०ऑनलाइन टास्क- ३१- १४फेडेक्स कुरिअर- ५- ७मनी लाँड्रींग- ०-१७डिजिटल अरेस्ट- ०- २सोशल मीडिया-१३- ८डेटा चोरी- १- ४इतर ऑनलाइन फसवणूक- ३३- १७.पोलिस आयुक्तालयाकडून पाठपुरावा -या संदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, त्यांनी परिमंडळनिहाय पोलिस ठाणी सुरू करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. तसेच, प्रशिक्षित आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना सायबर प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.