Water Supply : आंबेगाव तालुक्यात पाऊस लांबणीवर पडल्याने नागरिकांची धाकधूक वाढली; २५टँकरच्या ९४ फेऱ्याद्वारे ४१ हजार नागरिकांना पाणीपुरवठा

पाऊस लांबणीवर पडल्याने आंबेगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे.
water crisis in ambegaon tehsil

water crisis in ambegaon tehsil

sakal

Updated on

मंचर - पाऊस लांबणीवर पडल्याने आंबेगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत असून, सध्या ३० ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना २५ टँकरच्या ९४ खेपांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या माध्यमातून तब्बल ४१ हजार ४४२ नागरिकांची तहान भागविण्याची व्यवस्था करण्यात आली असून, २ हजार ६५४ जनावरांसाठीही पाण्याची सोय करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com