शनिवार वाड्याचा‌ दिल्ली दरवाजा उघडला

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 January 2021

थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे शनिवार वाड्याच्या २८९ व्या वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी पार पडला. यावेळी शनिवार वाड्याचा भव्य दिल्ली दरवाजा पूर्णपणे उघडण्यात आला.

पुणे - थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे शनिवार वाड्याच्या २८९ व्या वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी पार पडला. यावेळी शनिवार वाड्याचा भव्य दिल्ली दरवाजा पूर्णपणे उघडण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कार्यक्रमाची सुरुवात थोरले बाजीराव पेशवे व नानासाहेब पेशवे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ मोहन शेटे यांनी शनिवारवाड्याच्या आणि पेशव्यांच्या गौरवशाली इतिहासाची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी माजी आमदार मेधा कुलकर्णी, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवे आणि कुटुंबीय, प्रतिष्ठानचे अध्यक्ष निवृत्त एअर चीफ मार्शल भूषण गोखले, सचिव कुंदनकुमार साठे, मुकुंद काळे, श्रीकांत नगरकर, चिंतामणी क्षीरसागर, ब्राह्मण महासंघाचे मकरंद माणकीकर आदी उपस्थित होते. 

पुण्यात शाळेची घंटा वाजणार; 5वी ते 8वीचे वर्ग भरणार

शेटे म्हणाले, ‘‘हा वाडा कधीच शांत नव्हता, पराक्रमाचा सूर्य कधीच शांत नसतो. या वास्तुसमोर घडलेल्या पराक्रमाची तुलना करता येणार नाही. सतत ८० वर्ष भारतावर प्रभुत्व निर्माण करण्याचे काम या वाड्याने केले होते. पराक्रमाचा इतिहास या वाड्याला लाभला आहे.’’

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi gate shaniwarwada opened on Saturday