esakal | पुण्यात शाळेची घंटा वाजणार; पालकांची लेखी मंजुरी अत्यावश्यक
sakal

बोलून बातमी शोधा

pune school reopen order passes by pmc

राज्य सरकारने नुकतीच परीक्षांची घोषणा केली आहे. आता पुण्यात शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

पुण्यात शाळेची घंटा वाजणार; पालकांची लेखी मंजुरी अत्यावश्यक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : जगभरात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची भीती आहे. परंतु, भारतात जवळपास सर्व व्यवहार पूर्ववत झाल्यानंतरही कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट झालेली पहायला मिळत आहे. राज्यातही कोरोनाच्या रुग्णांचा आकडा मर्यादीत आहे. अशात शाळा कॉलेज कधी सुरू होणार? अशी चर्चा सुरू होती. राज्य सरकारने नुकतीच परीक्षांची घोषणा केली आहे. आता पुण्यात शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

पुण्यात महापालिकेने शाळा सुरू करण्या संदर्भातील आदेशाला मंजुरी दिली आहे. यात महापालिकेने काही गाईडलाईन्स दिल्या आहेत. त्या गाईडलाईन्सनुसारच शाळा सुरू करता येणार आहेत. या गाईडलाईन्स राज्य सरकारनेच जाहीर केलेल्या आहेत. त्यानुसार आता पाचवी ते आठवीचे वर्ग भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या 1 फेब्रुवारीपासून पुण्यात शाळांचे वर्ग भरणार आहेत.

शाळांसाठी गाईडलाईन्स
- स्कूल बस, व्हॅन यांचे निर्जंतुकीकरण होते, हे पाहण्याची जबाबदारी शाळेची 
- शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक
- शाळेतील वर्ग खोल्या किंवा बैठक व्यवस्थेमध्ये हवे सोशल डिस्टंसिंग 
- एका बाकावर एक नावा प्रमाणे बैठक व्यवस्था असावी 
- मुले रांगेत उभारताना सहा फुटांचे अंतर अत्यावश्यक 
- विद्यार्थ्यांच्या पालकांची लेखी संमती अत्यावश्यक
- शाळा परिसर स्वच्छतागृहांचे नियमीत निर्जंतुकीकरण आवश्यक