दिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

पुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. 

पुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. 

लेहरीसींग लिलासिंग (वय 25, रा.नवी दिल्ली) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. पथकाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे दिल्ली येथील मेट्रोपोलिटीन न्यायालयामध्ये प्रकरण सुरू आहे. त्याविषयी न्यायालयाकडून तक्रारदारास वॉरंट काढण्यात आले होते. संबंधीत वॉरंट तक्रारदाराला बजावण्याची जबाबदारी दिल्लीतील चित्तरंजन पार्क येथील सेंट्रल प्रोसेस पुल विभागातील पोलिस अधिकारी लिलासींग याच्यावर सोपविण्यात आली होती. त्यानुसार लिलासींगने तक्रारदाराशी संपर्क साधला. त्यानंतर तक्रारदाराला वॉरंट न बजावण्यासाठी चाळीस हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती 25 हजार रुपये देण्याचे ठरले.

दरम्यान. तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लिलासिंग यास 25 हजार रुपयांची रक्कम घेण्यासाठी पुणे रेल्वे स्थानक येथील हॉटेल होमलॅंड येथे बोलाविण्यात आले. त्यानंतर विभागाचे पोलिस अधिक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून लिलासिंग यास ताब्यात घेतले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Delhi Police sub-inspector was arrested in case of bribe in Pune