

Safety Under Scrutiny as Delivery Boy Allegedly Acts Inappropriately at Pune Hostel
sakal
पुणे: विद्यापीठातील परदेशी विद्यार्थिनींच्या वसतिगृहात शुक्रवारी रात्री एका डिलिव्हरी बॉयने प्रवेश करत विद्यार्थिनींसमोर अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक बाब शनिवारी अधिसभा सुरू असताना उघडकीस आली. दरम्यान, पोलिसात तक्रार दाखल न करण्यासाठी दबाव टाकल्याची तक्रार संबंधित विद्यार्थिनींनी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे केली. याची गंभीर दखल घेत याची सखोल चौकशी करून दोषींवर दोन दिवसांत कारवाई केली जाईल, असे डॉ. गोसावी यांनी स्पष्ट केले.