...म्हणून भिगवण कोविड सेंटरमध्ये अॅंटीजेन टेस्ट करण्याची केली जातीये मागणी 

प्रशांत चवरे
Saturday, 12 September 2020

इंदापूर तालुक्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन कोरोना रॅपिड अॅंटीजेन टेस्ट सेंटर भिगवण येथील कोविड केअर सेंटरमध्ये सुरु करावे, अशी मागणी मदनवाडीचे उपसरपंच तेजस देवकाते यांनी केली आहे.

भिगवण (पुणे) : इंदापूर तालुक्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन कोरोना रॅपिड अॅंटीजेन टेस्ट सेंटर भिगवण येथील कोविड केअर सेंटरमध्ये सुरु करावे, अशी मागणी मदनवाडीचे उपसरपंच तेजस देवकाते यांनी केली आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिले आहे. 

Breaking : राज्य सरकारने रेडी-रेकनरच्या दरात केली वाढ; सर्वाधिक पुणे जिल्ह्यात तर...

इंदापूर तालुक्यामध्ये सध्या केवळ इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना रॅपिड अॅंटीजेन टेस्टची सुविधा आहे. तालुक्यातील रुग्णांना तपासणीसाठी इंदापूर येथे जावे लागते. येथील केंद्रावर चाचण्यांचा मोठा ताण आहे. संपूर्ण तालुक्यातून नागरिक येथे येत असतात. त्यामुळे या केंद्रावर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चाचणीसाठी रुग्णासोबत गेलेल्या नागरिकांनाही धोका निर्माण होत आहे. भिगवण येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी रॅपिड टेस्ट सोय केल्यास तपासणीचा वेग वाढेल व पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांवर येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार शक्य होईल. त्यामुळे संसर्गाचा धोकाही कमी होईल. त्यासाठी भिगवण येथे कोरोना रॅपिड अॅंटीजेन टेस्ट सेंटर सुरु करावे, अशी मागणी देवकाते यांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for antigen test at Bhigwan covid Center