"झेडपी'तील बदल्या रद्द करण्याची मागणी 

zp-pune
zp-pune
Updated on

पुणे - पुणे जिल्ह्याच्या तुलनेत नांदेड आणि लातूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या खूप कमी आहे. तरीसुद्धा कोरोना संसर्ग वाढू नये, या उद्देशाने तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द केल्या आहेत. त्याचप्रमाणे पुणे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द कराव्यात, अशी मागणी जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संघटनेचे राज्य कोशाध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी आणि पुणे जिल्हा अध्यक्ष शेखर गायकवाड यांनी राम यांच्याकडे ही मागणी केली आहे. 

सध्या कोरोनाचे संकट असूनही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वरिष्ठ सहायकांच्या पदोन्नत्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केल्या. यानुसार वरिष्ठ सहायकांना कनिष्ठ प्रशासकीय अधिकारीपदी नियुक्ती देण्यात आली आहे. याबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसाद यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com