'गटारी'च्या पार्श्वभूमीवर मटण विक्रीबाबत करण्यात आलीये 'ही' मागणी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 July 2020

खाटीक बांधवांकडून गटारी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर रविवारी जी वेळ आठ ते बारा आहे. ती वेळ वाढवून रात्री सात वाजेपर्यंत मटण विक्री करता वेळ मिळावी या साठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले आहे.

पुणे : खाटीक बांधवांकडून गटारी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर रविवारी जी वेळ आठ ते बारा आहे. ती वेळ वाढवून रात्री सात वाजेपर्यंत मटण विक्री करता वेळ मिळावी या साठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले आहे. पुणे शहर व पिंपरी चिंचवडमध्ये १४ ते २३ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. परंतु, सरकारच्या नियमा नुसार १९ जुलै रविवार रोजी मटण विक्री साठी फक्त सकाळी ८ ते  दु १२ ही वेळ देण्यात आला आहे.

जेव्हा शरद पवार रमतात जुन्या आठवणींमध्ये...

त्या दिवशी आषाढी आमवस्या असून मटण विक्री मोठ्या प्रमाणात होत असते पण  फक्त ४ तासात विक्री करणे शक्य नाही. मटण हे नाशवंत माल असून २० जुलै पासून श्रावण महिना सुरू होतो. तेव्हा मटण विक्री जास्त होत नाही. मटण विक्री करणारा वर्ग हा देशव्यापी लॉकडाऊन व मंदी मुळे खूप अडचणीत आला आहे. त्यात १९ जुलै रविवारी व्यवसाय करता आला नाही तर मोठे संकट खाटीक बांधवां पुढे निर्माण होईल या साठी रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ७ पर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी ही विनंती व मागणी पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार व पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अखिल भारतीय खाटीक समाज पुणे शहर अध्यक्ष सिद्धेश विनायक कांबळे, धीरज घोडके, प्रथमेश घोडके, तुषार कांबळे,  शिवाजी कोतमिरे यांच्या माध्यमातून  हे निवेदन देण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for extension of time for sale of meat