नवी सांगवी : पदपथ व सायकल मार्ग विकसित करण्याची मागणी

मिलिंद संधान.
बुधवार, 13 जून 2018

नवी सांगवी (पुणे) - नाशिक फाटा ते जगताप डेअरी येथील साईचौक पर्यंत पदपथ व सायकल धावण मार्ग विकसित करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येऊ लागली आहे. भारतरत्न जे आर डी टाटा उड्डान पुलापासून पुढे 45 मिटर रूंदीचा रस्ता पुढे वाकड हिंजवडी पर्यंत गेला आहे. त्यातच पिंपरी चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्यामुळे या रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी पदपथ व सायकल ट्रँकची मागणी स्थानिकांनी ' सकाळ ' च्या माध्यमातून महापालिका प्रशासनाला केली आहे. 

पिंपळे गुरव, सौदागर, रहाटणी, विशालनगर, वाकड हा बहुतांशी आयटी इंजिनिअर्स, उच्च विद्याविभुषित, कारखानदार, बडे व्यावसायिक, उद्योगपतींचे वास्तव्य असलेला भाग. येथील प्रत्येक घराघरात दुचाकी बरोबर चारचाकी वाहन आहे, तर काहींकडे दोन दोन तीन तीन वाहणे आहेत. त्यामुळे येथून 45 मिटर रूदींचा रस्ता गेला असला तरी प्रत्येक व्यक्ती स्वतःचे वाहन घेऊन बाहेर पडत असल्यामुळे हा रस्ताही कमी पडत असल्याचे दिसत आहे. कोकणे चौकापासून शिवार, साईचौकात बहुतांश वेळा वाहतुक कोंडी झाल्याचे चित्र दिसत आहे. येथील बहुतांश संगणक अभियंते हिंजवडी परिसरात कामाला आहेत. त्यामुळे सायकलवरून सात आठ किमी अंतर पार करून आंम्ही सहजच आमच्या कामावर पोहचु शकतो असे त्यांचे म्हणने पडते. परंतु स्वतंत्र सायकल धावण मार्ग नसल्याने त्यांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे सायकल मार्ग झाल्यावर शारीरिक व्यायाम होऊन वाहतुक कोंडी व प्रदुषनाला आळा बसत असल्याचे येथील नागरिक सांगतात. याबाबत त्यांनी स्थानिक नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शितल काटे यांच्याकडेही आपले गाऱ्हाणे मांडले आहे. 

नगरसेवक नाना काटे म्हणाले, " स्मार्ट सिटी अंतर्गत अर्बनस्ट्रीट डेव्हलपमेंट नुसार रस्ते विकसित करणे संदर्भात मी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. स्मार्ट सिटीत दोन्ही बाजुंच्या पाच मिटर jरूंदीच्या रस्त्यात दोन मिटर पदपथ व तीन मिटर सायकल मार्गासाठीचे नियोजन आहे. त्यातच येथे चौकात भुयारी मार्गांचे काम चालु असल्याने रस्त्याची खोदाई केलीच असल्याने नवीन काम करताना पदपथ व सायकल धावण मार्ग विकसित करावे.
 
Web Title: Demand for footpath and cycle path development