MP Supriya Sule : समाजातील अस्वस्थतेची दखल घेत निवडणूक आयोगानेही बदल स्वीकारला पाहिजे

ईव्हीएम विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याबाबत चर्चेअंती पुढील आठवड्यात होणार निश्‍चित.
MP Supriya Sule
MP Supriya Suleesakal
Updated on

पुणे - अमेरिकेसह अनेक देशांमध्ये ईव्हीएमवर बंदी आहे. मी चार वेळा ईव्हीएमवर निवडून आले आहे, माझ्यासह समाजातही ईव्हीएमबाबत अस्वस्थता आहे. म्हणूनच ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, अशी मागणी होत आहे. त्याची दखल घेऊन निवडणूक आयोगानेही बदल केला पाहिजे, ' अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी केली. सर्वांशी चर्चा करूनच ईव्हीएम विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याबाबत पुढील आठवड्यात ठरविले जाणार असल्याचेही सुळे यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com