esakal | नारळाच्या मागणीत यंदाही घट
sakal

बोलून बातमी शोधा

नारळ

नारळाच्या मागणीत यंदाही घट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड : दरवर्षी गणेशोत्सवात नारळाला मोठी मागणी असते. परंतु मागील वर्षी आणि यंदाही कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने होत आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांकडून मागणी आहे. परंतु सार्वजनिक गणेशोत्सवातून आणि नारळ विकणाऱ्या स्टॉलधारकांकडून मागणी कमी आहे. सध्यस्थितीत अवघी ६० टक्केच मागणी आहे.

पुण्यात दररोज दहा ते बारा गाड्यांमधून साधारणतः चार लाख नारळांची आवक होते. नव्या नारळासह मद्रास, पालकोल, साफसोल आदी नारळ दाखल होत आहेत. सध्या तमिळनाडू व आंध्रप्रदेश या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे. यामुळे येथून येणारी आवक घटली असल्याची माहिती दि पूना मर्चंटस चेंबरचे माजी अध्यक्ष आणि नारळाचे व्यापारी दीपक बोरा यांनी दिली.

हेही वाचा: दीडशे फूट खोल दरीत कोसळला पण तरी बचावला

कोरोनामुळे देऊळ बंद तसेच उत्सवावर मर्यादा आल्याने पूजेसाठी होणारी मागणी यंदा नाही. अनंत चतुदर्शीपर्यंत ही आवक व मागणी कायम राहील, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मंदिरे, देवस्थाने बंद आहेत. गणेशोत्सवात अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे. त्यामुळे गणेशोत्सव असूनही नारळाला मागणी त्या तुलनेत कमीच आहे. गणेशोत्सवानंतर नारळाची मागणी कमी होईल.

हेही वाचा: ‘पीएमआरडीए’कडून हरकतींची वर्गवारी

मोदकासाठी गृहिणींकडून आणि मिठाई विक्रेते यांच्याकडून मद्रास व साफसोल नारळाला मागणी असते. सध्या नारळ उत्पादक क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे बाजारात आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत आवक चांगली असून, दरातही किरकोळ वाढ झाली आहे.
- दीपक बोरा, नारळाचे व्यापारी, मार्केट यार्ड.

यामुळे घटली मागणी
- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने
- सर्व मंदिरे, देवस्थाने बंद
- पूजेच्या साहित्यांचा व्यवसाय करणारे छोटे व्यावसायिक संकटात
- केवळ घरातील गणेशोत्सवाकरिता नारळाची मागणी
- सार्वजनिक गणेशोत्सवातून ८० टक्के मागणी कमी

हेही वाचा: ध्रुवीकडून 'फ्रेंडशिप'वर यशस्वी चढाई

बारा लाख नारळ विक्रीचा अंदाज
आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांतून मार्केट यार्डात नारळाची आवक होते. धार्मिक कार्यक्रमांमध्ये पूजा व तोरणासाठी नव्या नारळाला मागणी राहते. तर, हॉटेल व्यावसायिकांकडून मद्रास आणि सापसोल नारळाला मोठी मागणी असते. दरवर्षी गणेशोत्सवात १८ ते २० लाख नारळांची शहरात विक्री होते. मात्र यंदा त्यामध्ये घट झाली असून १२ ते १३ लाख नारळांचीच विक्री होईल.

घाऊक बाजारातील नारळाचे दर रूपयांत (शेकडा)
नवा नारळ ः १२७५ ते १५००
साफसोल ः १७०० ते २६००
मद्रास ः २८०० ते २९००
पालकोल ः १५०० ते १६००

loading image
go to top