esakal | ध्रुवीकडून 'फ्रेंडशिप'वर यशस्वी चढाई
sakal

बोलून बातमी शोधा

ध्रुवी गणेश पडवळ

ध्रुवीकडून 'फ्रेंडशिप'वर यशस्वी चढाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महाळुंगे पडवळ : महाळुंगे पडवळ (ता.आंबेगाव) येथील ध्रुवी गणेश पडवळ या आठ वर्षीय चिमुकलीने हिमालयातील फ्रेंडशिप शिखरावर यशस्वी चढाई केली.शिखराचे १५ हजार ४२० फूट अंतर सर करताच तिने हुतात्मा बाबू गेनू सैद यांना मानवंदना तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचाही जयघोष केला.

हेही वाचा: राज्यात यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून

हिमालयातील फ्रेंडशिप शिखर ही मोहीम लहू उघडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली होती. पुणे येथून दोन सप्टेंबर रोजी या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. यामध्ये ध्रुवी पडवळ, हर्षदा पडवळ, सौम्या कस्तुरे, आरती कस्तुरे, अनन्या जैन, हर्षिती भोईर, अर्णव जैन, कविराज भोईर हे मोहिमेत सहभागी झाले होते. ९ सप्टेंबर रोजी हिमालयातील फ्रेंडशीप शिखरावर १५ हजार ४२० फूट अंतर सुरक्षितरित्या ध्रुवीने चढाई केली. चढाई करण्यासाठी गिर्यारोहक स्नेहल घेरडे, तुषार दिघे व मनोज वांगड यांचे सहकार्य लाभले.

पुणे येथील सदाशिव पेठेतील भावे प्राथमिक शाळेत ती इयत्ता तिसरीत ध्रुवी पडवळ शिक्षण घेत आहे. शिवाजीनगर येथील राजे शिवाजी कलाईम्बिंग वॉलवर स्पोर्ट क्‍लाइंबिंग या खेळाचा ती दररोज सराव करते. महाळुंगे पडवळ येथील सरपंच सुजाता सचिन चासकर, हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर, ग्रामपंचायत सदस्य अनिल पडवळ, पांडुरंग बनकर, डॉ.दत्ता चासकर, प्रदिप डोके, राहुल पडवळ, अजित आवटे आदींनी ध्रुवी पडवळचे कौतुक केले.

हेही वाचा: पुणे : खडकवासला धरणातून 11 हजार 491 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

ध्रुवी हिची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

ध्रुवी पडवळ हिने लहान वयात कळसूबाई शिखर सर केल्यामुळे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिची नोंद झाली आहे. साडे चार वर्षाची असताना तिने भंडार दऱ्यातील सांधन व्हॅली रॅपलिंग केले. सहाव्या वर्षी तानाजी कडा सर करणारी ध्रुवी ही सर्वात लहान मुलगी ठरली होती. वजीर, तैल-बैला व डांग्या या सारखे सुळके चढून तिने गिर्यारोहण क्षेत्रात स्वत:चा ठसा अनोख्या पद्धतीने उमटविला आहे.

loading image
go to top