पुणे - येथील बांधकाम क्षेत्रातील गृहनिर्माणामध्ये पुणे पुन्हा एकदा देशातील सर्वाधिक किफायतशीर आणि विक्रीत आघाडीचे महानगर ठरले आहे. २०२५ च्या पहिल्या सहामाहीत पुणे मेट्रोपोलिटन क्षेत्रात ४४ हजार सदनिकांची विक्री झाली असून त्यातून ३२ हजार ८०० कोटींची उलाढाल झाली आहे.