Fruit Demand : उन्हाळ्यात रसदार फळांना मागणी वाढली

उन्हाची प्रखरता दिवसेंदिवस वाढण्यास सुरूवात झाली आहे. बाजारात रसदार फळांना मागणी वाढली आहे.
Fruit
Fruitsakal

मार्केट यार्ड - उन्हाची प्रखरता दिवसेंदिवस वाढण्यास सुरूवात झाली आहे. बाजारात रसदार फळांना मागणी वाढली आहे. उन्हामुळे शरीरातील कमी झालेली ऊर्जा पुन्हा मिळवण्यासाठी अनेकजण मोठ्या प्रमाणात फळे किंवा फळांचा ज्यूस पिण्यास प्राधान्य देतात.

कलिंगड, खरबूज, अननस, आंबे, मोसंबी, डाळींब, काळे आणि हिरवे द्राक्षे या मधूर चव असणाऱ्या फळांना मागणी वाढत आहे. फळांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते. ही फळे उन्हाळ्यात शरीराची पाण्याची गरज भरून काढण्यास मदत करतात. मागील आठवड्याच्या तुलनेत बाजारात फळांची आवक काहीशी घटल्याने डाळींब, कलिंगड, खरबूज भावात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर आवक वाढू लागल्याने द्राक्षांच्या भावात घट झाली आहे.

बाजारात पुणे उपनगरे, यासह लोणावळा, महाबळेश्वर, पाचगणी, पिंपरी चिंचवड तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, गोवा येथून मोठ्या प्रमाणात रसदार फळांना मागणी असते. फ्रुट सलाड आणि ज्यूस बनवण्यासाठी फळांना मोठी मागणी असते. तसेच घरी खाण्यासाठी ही मोठ्या प्रमाणात नागरिक याची खरेदी करतात. गेल्या काही दिवसांपासून बाजारात दिवसेंदिवस अवाक वाढत असल्याचे मार्केट यार्डातील व्यापारी माऊली आंबेकर यांनी सांगितले.

ऊन वाढेल तसे ग्राहकांची संख्या वाढणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दर स्थिर आहेत. पुढील काही दिवसात अजून अवाक वाढणार आहे. उन्हाळयात ग्राहक रसदार फळांना जास्त प्राधान्य देतात.

- पांडुरंग सुपेकर, व्यापारी, मार्केट यार्ड.

येथून होते आवक

- कलिंगड, खरबूज : श्रिंगोंदा, दौंड, सोलापूर, सातारा, कराड, शिरूर, कर्जत, राशन, कर्नाटक : ४०-५० टन

- मोसंबी : औरंगाबाद, नगर, सोलापूर : ४०-५० टन

- संत्री : अमरावती, नागपूर : १५ टन

- अननस : केरळ - ५-६ ट्रक

- डाळिंब : पुणे, सोलापूर, नाशिक, नगर : २०-२५ टन

- द्राक्षे : बारामती, सांगली, सोलापूर : २५ टन

- आंबा : कोकण : ६० पेटी

घाऊक बाजारातील दर

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : मोसंबी : (३ डझन) : १००-५००, ( ४ डझन) : २००-२५०, संत्रा : (१०किलो) : १५०-५००,

डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ४०-२५०, गणेश : १०-३०, आरक्ता २०-७०, कलिंगड : १२-१८, खरबूज : ३०- ३०, पपई : ७-१४, अननस (एक डझन) : १०० ते ६००, चिक्कू (दहा किलो ) : १००-५००.

आंबा -रत्नागिरी हापूस ४ ते ७ डझन - ३५०० ते ७००० रुपये.

किरकोळ बाजारातील दर्जानुसार प्रती किलोचा दर

कलिंगड - २०-३० रुपये

खरबूज - ३०-४० रुपये

पपई - २०-४० रुपये

मोसंबी - ८०-१०० रुपये

संत्रा - ८०-१२० रुपये

अननस - ५०-१०० रुपये (एक अननस)

डाळिंब - ८०-१०० रुपये

द्राक्षे - ५०-१०० रुपये

हापूस आंबा - १५०० - २५०० रुपये (डझन)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com