Dimbhe Canal Work
sakal
नारायणगाव - रब्बी पिकांसाठी डिंभे धरणातून आंबेगाव व शिरूर तालुक्यांसाठी डिंभे उजवा कालव्यात आवर्तन सोडण्यात आले आहे. मात्र मागणी करूनही डिंभे डावा कालव्यात पाणी सोडले जात नाही. याबाबत नारायणगाव, वारूळवाडी, गुंजाळवाडी भागातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कुकडी पाटबंधारे विभागाने डिंभे डावा कालव्यात तातडीने पाणी सोडावे. अशी मागणी नारायणगाव ग्रामपंचायत सदस्य हेमंत कोल्हे, तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष सागर दरंदळे यांनी केली आहे.