महापालिका निवडणुकीत चिन्ह हटवण्याची मागणी | Pune | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका निवडणुकीत चिन्ह हटवण्याची मागणी

महापालिका निवडणुकीत चिन्ह हटवण्याची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोथरुड : चिन्ह हटवा, लोकशाही वाचवा असे सांगत येणा-या निवडणुकीत चिन्ह हटवा अशी मागणी चेंज इंडिया फाऊंडेशनने केली आहे. कोथरुड डेपो चौकात लावलेल्या फलकावर फाऊंडेशनने आपली भूमिका मांडली आहे.

ईव्हीएमवर नकाराधिकाराचे बटण यावे अशी मागणी करण्यात पुढाकार घेणा-या चेंज इंडिया फाऊंडेशनचे संस्थापक सचिन धनकुडे यांनी, ईव्हीएम मशीन असो की बॅलेट पेपर दोन्ही वरील चिन्हे वगळून त्या व्यक्तीचा चेहरा व नाव लिहून मतदान घेतले जावे ही मागणी केली आहे. आपली भूमिका मांडण्यासाठी त्यांनी बारा तोंडी चिन्हरुपी राक्षसाची प्रतिमा कोथरुड डेपो चौकात लावली आहे. त्यावर पुढील आशयाचा मजकूर आहे. आपण स्विकारलेल्या संसदीय लोकशाहीमध्ये मतदाराने आपला लोकप्रतिनिधी निवडून देणे अपेक्षित असते.

हेही वाचा: कोयनेच्या वीज प्रकल्पाचा 'महानिर्मिती' बरोबरचा करार संपला

मात्र झाले उलटेच उमेदवाराला न पाहता लोक चिन्हाला मत देत आहेत. चिन्हांमुळे गटतट निर्माण झाले. राजकीय पक्षांनी चिन्हांची दुकानदारी सुरु केली. चिन्ह विकले जाऊ लागले. त्यामुळे अभ्यासू, प्रामाणिक राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्याची तळमळ असणारे व प्रश्नांची सोडवणूक करण्याची समज असणारे तज्ञ या निवडणूक पध्दतीत मागे पडले आहेत. त्यामुळे चिन्ह विरहीत निवडणुका व्हाव्यात अशी आमची मागणी आहे

धनकुडे म्हणाले की, चिन्हांच्या वेड्यात अडकलेल्या लोकप्रतिनिधींना त्यांच्या पक्षश्रेष्ठींना विचारल्याशिवाय कोणतीही भूमिका घेत नाही. जे स्वतः गुलाम आहेत त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार म्हणून चिन्ह विरहित निवडणुका हव्यात अशी आमची भूमिका आहे. मतदान करताना आपण चिन्हावर मोहोर उमटवतो. ज्यावेळी मतदार नाव आणि चेहरा पाहील त्यावेळी त्याच्या लक्षात येईल की या उमेदवाराचे स्व कर्तुत्व काय आहे. जो व्यक्ती स्वताचा विचार ठामपणे मांडू शकत नाही तो देशाचा समाजाचा काय विकास करणार?

loading image
go to top