कोयनेच्या वीज प्रकल्पाचा 'महानिर्मिती' बरोबरचा करार संपला | satara | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोयनेच्या वीज प्रकल्पाचा 'महानिर्मिती' बरोबरचा करार संपला

कोयनेच्या वीज प्रकल्पाचा 'महानिर्मिती' बरोबरचा करार संपला

sakal_logo
By
विजय लाड

कोयनानगर : राज्यातील जनतेला तिमिरा कडून तेजाकडे नेणाऱ्या कोयना जलविद्युत प्रकल्पाचे पायथा वीज गृह व ३२० मेगावॉट क्षमतेचा तिसऱ्या टप्प्याचा महानिर्मिती कंपनीने जलसंपदा विभागा बरोबर हे प्रकल्प चालविण्यासाठी केलेला ३५ वर्षाचा करार संपला आहे.महा निर्मिती कंपनी कडून हे प्रकल्प पुन्हा जलसंपदा विभागाकडे हस्तांतरीत करण्याचे आदेश शासनाने निर्गमित केले आहेत. खाजगीकरणाचे वेध लागलेल्या जलसंपदा विभागाकडून हे दोन्ही प्रकल्प टाटा पॉवर कडे जाण्याची शक्यता असून भाटघर प्रकल्पाप्रमाणे कोयनेचा पॉवर हाऊस टाटा पॉवर कंपनीकडे जाण्याची शक्यता आहे.

राज्याला प्रकाशमान करणाऱ्या कोयना जलविद्युत प्रकल्पाची निर्मिती जलसंपदा विभागाने केली आहे.जलसंपदा विभागातर्गत कार्यरत असलेल्या जलविद्युत संघटनेमार्फतही निर्मिती होते.प्रचलित कार्य नियमावली नुसार हे प्रकल्प उभारणी नंतर भाडेपट्टी तत्वावर परीचलन देखभालीसाठी महानिर्मिती कंपनीकडे हस्तांतरीत करण्यात येतात.

हेही वाचा: औरंगाबाद : दशमेशनगरात फोडली चार दुकाने

यानुसार २५९२.२७ स्थापित क्षमता असलेले २७ जलविद्युत प्रकल्प महानिर्मिती कंपनीकडे ३५ वर्षाकरिता भाडेपट्टीने करार करून हस्तांतरित करण्यात आले होते.जलविद्युत प्रकल्पातून होणारी वीजनिर्मिती पासून योग्य महसुली रक्कम राज्य शासनास प्राप्त होणे आवश्यक असल्याने जलसंपदा विभागाने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडून भाडेपट्टीची सुधारित रक्कम आयोगाच्या २७ ऑक्टोबर २००८ रोजीच्याआदेशाद्वारे निश्चित केली आहे.

सदर आदेशानुसार वीर व भाटघर जलविद्युत प्रकल्पाचे नियत ३५ वर्षाचे आयुर्मान पूर्ण झाल्यामुळे भाडेपट्टी मिळणे बंद झाल्यामुळे सदर प्रकल्प जलसंपदा विभागाकडे परत घेण्याचा निर्णय २०१० झाला आहे.या दोन प्रकल्पाचे नूतनीकरण व अधुनिकीकरण करून परीचालन करण्यासाठी बांधा वापरा हस्तांतरीत करा या तत्वावर खाजगी प्रवर्तकास देण्यात आला आहे. त्याच धर्तीवर कोयनेचे हे दोन प्रकल्प खाजगी प्रवर्तकालादेण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.

loading image
go to top