
पुणे : चंदननगर परिसरातील एका माजी सैनिकाच्या कुटुंबांवर बांगलादेशी असल्याचा आरोप करत घरात घुसून गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ‘नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी’च्या वतीने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे करण्यात आली. त्यावर धार्मिक द्वेष पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,’ असे आश्वासन पोलिस आयुक्तांनी दिले.