esakal | ''किराणा दुकानांची वेळ वाढवून द्या''; मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांची मागणी

बोलून बातमी शोधा

market yard
'किराणा दुकानांची वेळ वाढवून द्या; व्यापाऱ्यांची मागणी
sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे market yard- शहरातील किराणा दुकानाची वेळ बदलून ९ ते ३ करावी. यामुळे दुकानदारांना घाऊक बाजारातून माल खरेदी करता येईल (market yard grocery store) आणि तो दुकानात उतरवून घेता येईल. किराणा दुकानात सकाळी ११ पर्यंत दुकान उघडे ठेवण्याची मुभा आहे. परंतु यातील निम्मा वेळ दुकान उघणे आणि बंद करण्यातच जात आहे. त्यामुळे दुकानाची वेळ वाढवून देण्यात (Increase grocery store hours) यावी. अशी मागणी व्यापाऱ्यांनी (traders ) केली आहे. (Demand from traders in the market yard Increase grocery store hours)

व्यापाऱ्यांच्या बाबतीत सरकारने दिलेल्या आदेशांच्या संदर्भात नेहमीच व्यापारी कटिबद्ध आहेत. त्यांनी दिलेल्या कायद्याचे तंतोतंत पालन केले जाते आहे. परंतु सध्या व्यापारासाठी दिलेली ७ ते ११ या वेळेचा प्रत्यक्षात काहीच उपयोग होत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सकाळी सात वाजता दुकाने उघडून माल बाहेर लावावा लागतो. तसेच दुकानातील कामगार ही उशिरा येतात. ग्राहकांनी दिलेली यादी तयार करण्यात वेळ जातो. त्यामुळे यातील निम्म्यापेक्षा जास्त वेळ दुकान उघणे आणि बंद करण्यातच जात असल्याने प्रशासनाने वेळेबाबतचा निर्णय बदलण्याची गरज असल्याचे व्यापारी अभय संचेती यांनी सांगितले.

हेही वाचा: पुणे मार्केट यार्डात होणार कोविड लसीकरण केंद्र

दि पूना मर्चंटस् चेंबरचे सचिव विजय मुथा म्हणाले, मार्केट यार्डमध्ये नियमितपणे शेंगदाणा, तेल, साखर, तूप, साबुदाणा यासह विविध अत्यावश्यक माल घेण्यासाठी ग्राहक येतो. भुसार बाजार सकाळी साधारणतः ९:३० ते १० पर्यंत सुरू होतो. तसेच हमाल, कामगार यांनाही यायला वेळ होतो. तसेच मार्केट यार्डात माल भरेपर्यंतच आकरा वाजतात. तोपर्यंत दुकाने बंद करण्याची वेळ झालेली असते. त्यामुळे माल दुकानी जाऊन उतरवायचा प्रश्न निर्माण होतो. प्रशासनाने वेळ वाढवून देण्याची गरज आहे. यामुळे दरवाढ आणि अन्न धान्याचा तुटवडा निर्माण होणार नाही. नागरीकांनाही त्रास होणार नाही.

हेही वाचा: मार्केट यार्ड : स्वच्छतागृहाच्या ठिकाणीच थाटले बेकायदेशीररित्या गाळे

किराणा दुकानांची वेळ वाढविल्याने व्यापार सुरळीत होईल. आकराची वेळ असल्याने घाऊक मालाला ग्राहक राहिलेला नाही. घाऊक बाजारात ग्राहक साधारणतः दहा नंतर येतात. परंतु किराणा दुकानेच आकरा वाजता बंद होत असल्याने ते माल घेऊन जाणार कसे आणि तो उतरणार कसा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळ वाढवून द्यावा., असं व्यापारी अभय संचेती म्हणाले. किराणा दुकानात २०० हून अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतात. वस्तू लावणे आणि काढणे यात खूप वेळ जातो. ७- ११ ही वेळ योग्य नाही. त्यासाठी किराणा दुकानाची वेळ ९ ते ३ करावी. त्यामुळे एकाच वेळी होणारी गर्दीही कमी होईल, किराणा दुकानदार उदय चौधरी म्हणाले.