महाविद्यालयाबाबतचा 'तो' आदेश तत्काळ रद्द करा; शिक्षक संघटनेची सरकारकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

आत्ता मोठ्या शहरातील लोकल सेवा बंद आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक करताना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक एकत्र कॉमन रूममध्ये बसतात.

पुणे : महाविद्यालयात १०० टक्के उपस्थित राहण्यासंदर्भातील आदेश राज्य सरकारने तत्काळ रद्द करावा, अशी मागणी शिक्षक हितकारणी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी केली आहे. राज्य सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठांतील प्राध्यापकांनी महाविद्यालयात उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.

'जम्बो'ने कामगिरी सुधारली; एकाच दिवशी २८ रुग्णांना दिला डिस्चार्ज!

याबाबत पवार म्हणाले, "हा निर्णय राज्यातील सर्व प्राध्यापकांसाठी धक्कादायक आहे. संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना, नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, सार्वजनिक ठिकाणी जायचे टाळा,  तसेच जमावबंदीचे आदेश हे कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी दिलेले आहेत. असे असताना दुसऱ्या बाजूला या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात प्राध्यापकांचा सार्वजनिक ठिकाणी वावर वाढणार आहे.

पुण्याचे नवे ‘सीपी’ देणार पुणेकरांचे प्रश्‍न सोडविण्यावर भर​

आत्ता मोठ्या शहरातील लोकल सेवा बंद आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक करताना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक एकत्र कॉमन रूममध्ये बसतात. त्यामुळे पुढच्या काळात हा संसर्ग सगळीकडे मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा शासन निर्णय तत्काळ मागे घ्यावा अथवा त्याला स्थगिती द्यावी." संघटनेच्या वतीने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करणारे निवेदन राज्य सरकारला दिल्याचे पवार यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for immediate cancellation of 100 percent attendance in college