दुधाचे भाव घटल्याने आता शेतकरी...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 August 2020

दुधाचे भाव घटल्याने दुभती जनावरे झाली मातीमोल. 
 

रांजणगाव सांडस : जगावरती कोरोनाचे संकट आल्यामुळे दुधाची मागणी घटली आहे. गाईच्या दुधाचा भाव १८ ते २३ रुपये लिटर झाला आहे. त्यामुळे दुभत्या जनावरांच्या किमती मातीमोल झाल्या आहे. एकीकडे दुधाला दर नसल्याने गाई सांभाळने परवडेना तर दुसरीकडे गाई घेण्यासाठी ग्राहक नसल्याने गाईचे दर कोसळ्याने गाई विकता येईना आशी शेतक-याची अवस्थता झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पाण्य़ापेक्षा दुध स्वस्त झालय ही आतिशक्ती नाही तर कोरोना  संकट काळात हे वास्तव आहे.बाटली बंध पाण्याचा दर २० ते २५ रुपये आसताना गाई दुधाचा दर शिरुर तालुक्यातील पुर्व भागातील वडगाव रासाई,रांजणगाव सांडस, आलेगाव पागा, उरळगाव, आरणगाव, नागरगाव, दहिवडी, पारोडी, आदि गावात १८ ते २३ रुपये लिटर पर्यंत येऊन थांबला आहे. पुढे ग्रांहकांना हे दुध ४० रुपयांपासुन ५० रुपयए लिटर पर्यंत विकले जाते. त्यात कोणतेही घसरण झालेली नाही. 

गाई म्हशीच्या दुधाचे दर २८ ते ३५ आसताना व गुरांचा बाजार चालु आसताना व्यावहारही तेजित होते. जर्सी किंवा होलस्तीन जातीच्या गाभन कालवडीला व जादा दुध देणा-या मु-हा, जाफराबादी, पंढरपुरी आदि जातीच्या  म्हैशीला व गाईला लाखाच्या पुढे भाव्व मिळत होता. परंतु कोरोना संकंट आल्यामुळे सर्वत्र दुधाची मागणी घटल्याने सहकारी आणि खासगी संघापुढे शिल्लक दुधाचे करायचे काय आसा प्रश्न तयार झाला आहे.

त्यातच देशासह महाराष्ट्रात दुधाची भुकटी शिल्लक आहे. त्यामुळे तोटा कमी करण्यासाठी संघानी गेल्या अनेक दुधाच्या खरेदी दरात घट सुरु केली आहे. त्याचा फटका दुध उत्पादक शेतक-यांना बसत आहे. किमान उत्पादन खर्च तरी कसाबसा निघेल या आशेने शेतकरी गाई म्हशी एप्रिल पासुन सांभाळत आहे. परंतु बहुतांश दुध संस्थांनी दुधाचा दर आतिशय कमी केल्यामुळे गाई म्हशीचे दर कमालीचे घसरल्याने आहे एक लाखापेक्षे जास्त दराने विकली जाणारी गाभण कालवड गाई व म्हैस ३० ते ५० हजारावर आली आहे.

देशाचा जलखजिना आता एकाच क्लिक वर

रांजणगाव (ता.शिरुर) येथील दुध उत्पादक शेतकरी सागर रणदिवे म्हणाले की पशु खाद्य, औषधोपचाराचा खर्च , चारा, खनिज मिश्रणे आदि खर्च आवाका बाहेर गेला आहे. उत्पादन खर्च निघत नाही. दुधाला दर नसल्याने गाई सांभाळणे परवडॆना तर दुसरीकडे बाजार बंध आसल्याने गाई विकायची कुठे ? व्यापारी घरी आल्यावर आतिशय कमी किमतीत मागतात त्यामुळे गाई विकता येईणा आशी आवस्था झाली आहे.

जेनेरिया औषधांच्या निर्यातीच्या बदल्यात आमेरिकेच्या दुध उत्पादकांना भारताची  बाजारपेठ खुली करण्याचा दुदैवी निर्णय केंद्र सरकारणे घेतला आहे. त्यामुळे दुध संघा बरोबरच दुध उत्पादक शेतक-यांचे भवितव्य धोक्यात येणार आहे. असे अनेक शेतकरी विरोधी धोरण केंद्र सरकार घेत आहे. -अॅड. अशोक पवार, आमदार

(Edited by : Sagar Diliprao Shelar)   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for milk has declined