
गराडे (पुणे) : सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. या पार्श्वभूमीवर सुरुवातीपासून पत्रकार प्रशासनास सहकार्य करीत आहेत. कोरोना बाधित पत्रकारांची वाढती संख्या आणि विद्यमान व्यवस्थेत त्यांची होणारी हेळसांड टाऴण्यासाठी प्रत्येक शासकीय आणि धर्मदाय आयुक्तांच्या अखत्यारित येणार्या खासगी रूग्णालायात बाधित पत्रकारांसाठी राखीव बेडची व्यवस्था करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना पुणे जिल्हा पत्रकार संघाने देऊन याबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनाही हे निवेदन देण्यात आले. रुग्णालयांमध्ये उपचारासाठी गेलेल्या पत्रकारांची होणारी हेळसांड लक्षात घेऊन रूग्णालायांत पत्रकारांसाठी राखीव बेडची व्यवस्था व्हावी, अशा मागणीचे निवेदन राज्यातील सर्व जिल्हा पत्रकार संघानी द्यावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केले होते. त्यानुसार मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे व पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे यांच्या सूचनेनुसार पुणे जिल्हा पत्रकार संघाने हे निवेदन तातडीने दिले.
यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, परिषद प्रतिनिधी एम. जी. शेलार, जिल्हा समन्वयक सुनील जगताप, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सुनील वाळुंज, कार्यकारीणी सदस्य दादाराव आढाव, अमित टाकळकर, हवेली पत्रकार संघाचे सचिव अमोल भोसले, संघटक सुनील सुरळकर, प्रमोद गव्हाणे उपस्थित होते. पुणे जिल्हा पत्रकार संघाने यावेळी डॉ. देशमुख यांच्याशी चर्चा करीत असताना राज्यात कोरोनामुळे मृत पावलेल्या पत्रकारांच्या कुंटुंबियांना राज्यशासनाने केलेल्या घोषणे प्रमाणे ५० लक्ष रुपयांची मदत तातडीने द्यावी. जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी पुणे जिल्हा पञकार संघाच्या शिष्टमंडळाला सर्व मागण्यांचा प्राधान्याने विचार करुन वरिष्ठांना तातडीने कळून पत्रकारांना न्याय देण्याची भूमिका घेवू असे आश्वासन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.