मुठा नदीपात्रात पाणी कम जलपर्णी ज्यादा...

हरीश शर्मा
Monday, 13 July 2020

बोपोडी येथील मुठा नदीपात्रातील जलपर्णी काढण्याची मागणी

खडकी बाजार (पुणे) : बोपोडी येथील मुठा नदीपात्र संपूर्ण जलपर्णीने व्यापले असून बोपोडी, खडकी, सांगवी येथील नदीकिनारी असलेल्या नागरिकांचे आरोग्य डास वाढल्यामुळे धोक्यात आले आहे. याकरिता नदीतील जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेने प्रयत्न करावे व परिसरात धूर फवारणी सुरू करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बोपोडी अध्यक्ष अंकित नाईक यांनी सहाययक आयुक्त औंध क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.                 

पुणेकरांनो, नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई होणार 

खडकी बोपोडी येथे दरवर्षी मुठा नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचते व दरवर्षी येथील नागरिकांना मच्छर डास यांपासून अनेक आजार जडत आहेत. मात्र, याकडे महापालिकेचे पूर्ण दुर्लक्ष झालेले आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरवातीलाच जलपर्णीचा त्रास येथील रहिवाश्यांना सोसावा लागत आहे, मात्र महापालिका याकडे काना डोळा करत असून शेवटी जुलै ऑगस्ट महिन्यात पावसामुळे नदीला पाणी येऊन त्यावेळी जलपर्णी वाहून पुढे जाते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

यंदा जुलै महिना सुरू असूनही संपूर्ण नदीपात्रात जलपर्णीचे साम्राज्य पसरले आहे महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्यास मनसे स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा नाईक यांनी निवेदनाद्वारे केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for removal of water hyacinth from Mutha river at Bopodi