esakal | कामशेत-चिखलसे रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

kamshet

कामशेत-चिखलसे रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कामशेत : कामशेत चिखलसे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची दुरूस्ती करावी. तसेच दोन्ही बाजूच्या गटरांची डागडुजी करून सांडपाणी निच-याची व्यवस्था करावी, अशी मागणी मावळ तालुका युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष गणेश काजळे यांनी केली. या रस्त्यावर महामार्गापासून खड्डे पडायला सुरूवात झाली ते थेट दौंडे कॉलनी पर्यत. रस्यावर पडलेल्या खड्ड्यातून आमचा प्रवास सुरू असल्याची तक्रार वाहन चालक करीत आहे.

पवन मावळाला जोडणारा हा मुख्य रस्ता वाहनांच्या वर्दळीने सतत गजबजलेला असतो. चिखलसे येवलेवाडी वरून हा रस्ता पुढे बौर,राऊतवाडी,येळसे,कडधे वरून पवनानगरला जोडला जातो. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने पवन मावळातील नागरिक कामशेतच्या बाजारपेठेत खरेदी साठी येत आहेत. शिवाय पवना धरण परिसरात हजारोंच्या संख्येने पर्यटक जात आहे. नागरिकांसह पर्यटक रोजच या खड्ड्यातून जात असल्याची नाराजी ब्राम्हणवाडी येथील गणेश वाळुंजकर यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभलेल्या डिप्रेस्ड क्लासेस मिशनला

काही दिवसांपूर्वी सार्वजनिक विभागाने या रस्त्याची तात्पुरती डागडुजी केली खरी,पण त्याचा फारसा उपयोग झालाच नाही. मुसळधार पावसात डागडुजी केलेली खडी उखडून गेली आणि पुन्हा जैसे थे खड्डे पडले. या रस्त्याची दुरूस्ती करावी या मागणीसाठी काजळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांची भेट घेऊन गणेशोत्सव पूर्वी हे काम मार्गी लाववे असे साकडे घातले.

-रामदास वाडेकर

loading image
go to top