निलायम पुलाखालील रस्त्याची अवस्था पाहून तुम्हीही म्हणाल रस्ता आहे की...

सागर कुलकर्णी
शनिवार, 11 जुलै 2020

रस्ता लवकरात लवकर दुरूस्त करण्याची मागणी

पुणे : सर्वे नंबर १३२ सिंहगड रोडवर निलायम पुलाच्या खाली तीन ठिकाणी महापालिकेकडून रस्त्याचे खोदकाम करण्यात आले होते. महावितरणच्या केबल नेण्यासाठी याठिकाणी रस्ता खोदण्यात आला होता. केबलचे काम झाल्यानंतर खोदलेला रस्ता दुरूस्त करणे अपेक्षित होते. महापालिकेकडून तब्बल बारा दिवसांनंतर रस्ता दुरूस्त करण्यात आला नाही. शहरातील सिंहगड रोड हा मुख्य रस्ता आहे. याठिकाणी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. रस्त्यावरील डांबर पूर्णपणे उखडले आहे. हा रस्ता अद्यापही दुरूस्त झालेला नाही. रस्ता दुरूस्त झाला नाहीतर याठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. याठिकाणी रस्ता लवकरात लवकर दुरूस्त करणे अपेक्षित असताना महापालिकेकडून रस्ता तसाच ठेवण्यात आलेला आहे.

बारामतीत कोरोनाग्रस्त रुग्ण वाढताहेत; आता आणखी...

नागरिकांना यामुळे वाहने चालविताना अडथळा येत आहे. याठिकाणी दोनचाकी वाहन घसरून अपघात होऊ शकतो. यामुळे वाहनचालकांना धोका आहे. महापालिका प्रशासन याकडे बारा दिवस होऊनही दुर्लक्ष करताना दिसत आहे. याठिकाणी लवकर रस्ता झाला नाहीतर होणाऱ्या अपघाताच्या घटनांना महापालिका जबाबदार रहाणार का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महापालिकेच्या या दुर्लक्षित कारभाराचा फटका नागरिकांना बसू शकतो. यामुळे हा रस्ता लवकरात दुरूस्त होणे आवश्यक आहे. जेणेकरून याठिकाणी होणारा नागरिकांना त्रास थांबवला जाऊ शकतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

 

महापालिकेच्या दुर्लक्षित कारभारामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. बारा दिवस झाले तरी महापालिका प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही हा रस्ता लवकरात लवकर दुरूस्त करावा अशी आमची मागणी आहे‌
-संदिप काळे, नागरिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for repair of road under Nilayam bridge