रुपी बँकेच्या विलिनीकरणाचा विषय पूर्णत्वास नेण्याची शरद पवारांकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 डिसेंबर 2019

रुपी सहकारी बॅंकेचे अन्य सक्षम बॅंकेत विलीनीकरण करून खातेदार-ठेवीदारांसह कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणरी बॅंक कर्मचारी संघाने (इंटक) माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पुणे : रुपी सहकारी बॅंकेचे अन्य सक्षम बॅंकेत विलीनीकरण करून खातेदार-ठेवीदारांसह कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणरी बॅंक कर्मचारी संघाने (इंटक) माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रूपी बॅंकेचे हजारो ठेवीदार-खातेदार असून, बॅंक प्रगतीपथावर होती. 2013 नंतर बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेने प्रशासक नेमल्यानंतर ठेवीदारांसोबतच कर्मचाऱ्यांचेही आर्थिक नुकसान झाले आहे. बॅंकेच्या प्रशासकांनी बॅंकेची स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यामुळे बॅंक आर्थिक तोट्यातून बाहेर येत आहे. ठेवीदार आणि कर्मचाऱ्यांनीही संयम ढळू दिलेला नाही. गेल्या सात वर्षांत रुपी बॅंकेचे अन्य बॅंकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न झाले. परंतु अद्याप निराशाच हाती आली आहे. अशा स्थितीत महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने रुपी बॅंकेची आर्थिक तपासणी आणि पडताळणी पूर्ण केली आहे.

भाजपच्या 'या' खासदाराविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल

राज्य बॅंकेचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी रुपी बॅंकेच्या विलिनीकरणास सकारात्मकता दर्शवली आहे. सहकार क्षेत्रातील नावाजलेली रुपी बॅंक बुडाल्यास सहकारी बॅंकिंग क्षेत्राला मोठा धक्‍का बसेल. अनास्कर यांनी पुढाकार घेऊन रुपीच्या विलिनीकरणाला मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे लवकरात लवकर रुपी बॅंकेच्या विलिनीकरणाचा विषय पूर्णत्वास न्यावा, अशी मागणी बॅंक कर्मचारी संघाचे अध्यक्ष गिरीश मेंगे, सहसचिव राहुल आलमखाने यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for Sharad Pawar to complete the issue of merge of rupee bank