काय तो निर्णय घ्या, अन्‌ पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करा; सोसायटीधारकांची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

पुणे शहरातील सहा मीटर रुंदीचे 323 रस्त्यांचे 210 कलमाखाली नऊ मीटर रुंदीकरण करून त्यावर टीडीआर वापरण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समिती समोर ठेवला होता.

पुणे : शहरातील सर्व सहा मीटर रुंदीच्या रस्त्यांवर टीडीआर वापरण्यासंदर्भात राज्य सरकार आदेश काय येईना आणि स्थायी समितीच्या निर्णयाची महापालिका प्रशासन अंमलबजावणी सुरू करेना, अशा दुहेरी कात्रीत शहरातील जुन्या सोसायट्या अडकल्या आहेत. त्यामुळे यातून लवकर मार्ग काढा आणि पुनर्विकासाला परवानगी द्यावी, अशी मागणी आता सोसायट्यांकडून होऊ लागली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहरातील सहा मीटर रुंदीचे 323 रस्त्यांचे 210 कलमाखाली नऊ मीटर रुंदीकरण करून त्यावर टीडीआर वापरण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समिती समोर ठेवला होता. त्यावरून वाद झाल्यानंतर समितीने या प्रस्तावास मंजुरी देताना शहरातील सर्व सहा मीटर रुंदीचे रस्ते नऊ मीटर करण्यात आणि त्यावर हरकत-सूचना मागविण्यास देण्याची उपसूचना मांडून मान्यता दिली होती. त्यानंतर शहरातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पालकमंत्री अजित पवार यांना भेटून समितीचा ठराव रद्द करावा आणि सर्वच सहा मीटर रुंदीच्या रस्त्यांवर टीडीआर वापरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. पवार यांनी देखील त्यास मान्यता दिली होती. त्यामुळे शहरातील जुन्या सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला होता. 

लग्नाच्या पूजेनंतर डीजे लावून सुरू होता डान्स, पोलिसांनी काढली अशी वरात

परंतु त्यास दोन आठवड्यांचा कालावधी झाला. अद्याप सरकारकडून त्याबाबतचे कोणतेही आदेश महापालिकेला प्राप्त झालेले नाहीत. तसेच समितीच्या निर्णयाला स्थगिती दिल्याचे कोणतेही आदेश प्राप्त झाले नाही. तसेच स्थायी समितीमध्ये निर्णय होऊनही प्रशासनाकडून त्यावर कोणतीही अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे सोसायट्या दुहेरी कात्रीत सापडल्या आहेत. त्यामुळे यावर काय तो मार्ग तातडीने काढा, पण सोसायट्यांना पुनर्विकास लवकर परवानगी द्या,अशी मागणी आता सोसायट्यांकडूनच होऊ लागली आहे. 

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होणार...

''कोथरूड येथे आमची जुनी सोसायटी आहे. आजूबाजूच्या देखील चार ते पाच सोसायट्या आहे. त्यांच्या पुनर्विकास रखडला आहे. सहा मीटर रुंदीच्या रस्त्यावर टीडीआर वापरण्यास परवानगी मिळणार असल्यामुळे या सर्व सोसायटीधारकांमध्ये पुनर्विकास होणार अशी आशा पल्लवित झाली होती. महापालिकेकडे चौकशी केल्यानंतर त्यावर शासनाकडून अद्याप निर्णय आलेला नाही, असे सांगण्यात आले. याबाबत लवकर निर्णय घ्यावा आणि सोसायटीला पुनर्विकासासाठी परवानगी द्यावी.''
- एन. डी. कन्नन (रहिवाशी) 

जिजा आणि दाजी; वाचा शरद पवार यांच्या लग्नाची गोष्ट!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand of Society holders to take decision about redevelopment of old societys