लग्नाच्या पूजेनंतर डीजे वाजवून सुरू होता डान्स, पोलिसांनी अशी काढली वरात

प्रफुल्ल भंडारी
शनिवार, 27 जून 2020

दौंड शहराला लागून असलेल्या लिंगाळी येथे लग्नानंतरच्या पूजेत रात्री कर्णकर्कश आवाजात ध्वनीवर्धक यंत्रणा (डीजे) वाजविल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. 

दौंड (पुणे) : दौंड शहराला लागून असलेल्या लिंगाळी येथे लग्नानंतरच्या पूजेत रात्री कर्णकर्कश आवाजात ध्वनीवर्धक यंत्रणा (डीजे) वाजविल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. 

...तर पेट्रोल- डिझेलचे दर निम्म्याने कमी होतील...
                 
दौंडच्या पोलिस उप अधीक्षक (आयपीएस) एेश्वर्या शर्मा या पोलिस पथकासह २५ जून रोजी रात्री साडेअकरा वाजता दौंड- लिंगाळी रस्त्यावर गस्त घालत होत्या. त्या दरम्यान त्यांना लिंगाळीमधील अशोकनगर परिसरात जोरात गाण्यांचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. अशोकनगर येथे राजेश वत्रे यांच्या घरात लग्नानंतरच्या पूजेत गाणी वाजवून त्या गाण्यांच्या तालावर काही जण नाचत होते. पोलिस पथकाने कारवाई करीत डीजे संच ताब्यात घेतला. 

अशी सुरू ठेवता येतील सलून आणि ब्यूटी पार्लर

या प्रकरणी डीजे मालक संदीप जगन्नाथ शितोळे (रा. आलेगाव, ता. दौंड) याच्यासह आयोजक राजेश शिवाजी वत्रे (रा. लिंगाळी, ता. दौंड), ज्ञानेश्वर गोरखनाथ पाटोळे (रा. नानवीज, ता. दौंड), सुरज शिवाजी काळभोर (रा. खडकी, ता. दौंड) या चौघांवर भारतीय दंड विधान मधील कलम कलम १८८ (संचारबंदी आदेशाची अवज्ञा करणे), कलम २६९ (जीवितास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असलेली हयगयीची कृती करणे) आणि ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
पोलिस कॅान्स्टेबल शुभम भोसले यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पांडुरंग थोरात पुढील तपास करीत आहेत.  लिंगाळीमधील वेताळनगर येथे एकाच कुटुंबातील ४ जणांना १८ जून रोजी कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police action against DJs in Daund