आता पीएमपी राबविणार दर महिन्याला 'बस डे`

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

पुणे : दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये "बस डे' राबविण्याचा निर्णय पीएमपीने घेतला आहे. त्यानुसार आता 11 मार्च रोजी "बस डे' होणार आहे. त्या दिवशी 1900 पेक्षा जास्त बस रस्त्यावर आणणे आणि दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळविणे, हे उद्दिष्ट पीएमपीने ठरविले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करायची असेल तर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम केली पाहिजे, हे "सकाळ'ने 1 नोव्हेंबर 2012 रोजी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये नागरिकांच्या मदतीने साकारलेल्या "बस डे'च्या उपक्रमातून सिद्ध केले पाहिजे. त्या दिवशी सुमारे तीन हजार बस मार्गांवर धावत होत्या. त्यामुळे प्रदूषणाची पातळीही कमी झाली होती अन वाहतूक कोंडीही दूर झाल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला होता. या अभिनव प्रयोगातून पीएमपीने 10 फेब्रुवारी रोजी बस डे आयोजित केला होता. त्या दिवशी 1807 बस रस्त्यावर धावल्या आणि उत्पन्नही एक कोटी 89 लाख रुपयांपर्यंत पोचले होते.

‘पीएमआरडीए’चे योग्य व्हिजन हवे - महेश झगडे

आता 11 मार्च रोजी बस डे आयोजित करण्यात आला आहे. त्या दिवशी 1900 पेक्षा जास्त बस मार्गांवर धावतील, असे नियोजन प्रशासनाने केले आहे. नव्या 150 ई- बस, 400 सीएनजीवरील बस, नव्या 200 बस, 200 मिडी बस रस्त्यावर धावतील. शहर आणि पिंपरी चिंचवडमधील प्रमुख मार्गांवर दर पाच मिनिटांला बस मिळेल. तसेच सर्व प्रमुख स्थानकांवर जादा कर्मचारी नियुक्त करण्यात येतील. तर, स्वारगेट, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे स्टेशन, महापालिका भवन, भोसरी, पिंपरी आदी गर्दीच्या स्थानकांवर लाऊड स्पिकर लावण्यात येणार आहेत.
 
#PuneMetro मेट्रोच्या कामात भूसंपादनाचा अडथळा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now the PMP will implement Bus Day every month