Jejuri Donkey Market : मागणी वाढल्याने गाढवांचा बाजार वधारला; जेजुरीत २५ हजार ते एक लाख रुपयांपर्यंत विक्री
Animal Market : पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीत गाढवांचा बाजार भरला आहे. यंदा गाढवांची संख्या कमी असली तरी मागणी वाढल्यामुळे २५ हजार ते एक लाख रुपयांपर्यंत गाढवांची विक्री झाली आहे.
जेजुरी : पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीत गाढवांचा बाजार भरला आहे. बाजारात यंदा गाढवांची संख्या कमी दिसून आली. मात्र मागणी वाढल्याने गाढवांचा बाजार वाढला आहे. २५ हजारांपासून एक लाखापर्यंत गाढवांची विक्री झाली.