पुणे : अंदाजपत्रक छापल्याने हेमंत रासने यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

महापालिकेची मुदत संपण्याच्या शेवटच्या दिवशी १४ मार्च रोजी स्थायी समिती अध्यक्षांनी त्यांच्या योजनांचे समावेश असलेल्या अंदाजपत्रकाचे पुस्तक छापून त्याचे वाटप केले.
Hemant-Rasane
Hemant-RasaneSakal
Summary

महापालिकेची मुदत संपण्याच्या शेवटच्या दिवशी १४ मार्च रोजी स्थायी समिती अध्यक्षांनी त्यांच्या योजनांचे समावेश असलेल्या अंदाजपत्रकाचे पुस्तक छापून त्याचे वाटप केले.

पुणे - महापालिका आयुक्तांनी (Municipal Commissioner) मांडलेल्या अंदाजपत्रकाला (Budget) उपसूचना देऊन त्यात सुधारणा केलेल्या आहेत. असे असताना स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी स्वतःच्या नावाने अंदाजपत्रक छापल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी रासने यांच्यावर गुन्हा (Crime) दाखल करावा अशी मागणी स्थायीचे माजी सदस्य विशाल तांबे (Vishal Tambe) यांनी केली आहे.

महापालिकेची मुदत संपण्याच्या शेवटच्या दिवशी १४ मार्च रोजी स्थायी समिती अध्यक्षांनी त्यांच्या योजनांचे समावेश असलेल्या अंदाजपत्रकाचे पुस्तक छापून त्याचे वाटप केले. त्यास तांबे यांनी हरकत घेतली आहे. जर स्थायी समिती अध्यक्षांनी अंदाजपत्रक मांडलेच नाही तर महापालिकेचे बोधचिन्ह वापरून पुस्तक कसे छापले, हा गोपनीयतेचा भंग असल्याने गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

Hemant-Rasane
पुणे जिल्ह्यात अवघड क्षेत्रात ७६८ शाळा

‘कोरोनामुळे ज्या योजना पूर्ण होऊ शकल्या नाहीत. त्याची माहिती त्या पुस्तिकेत दिली आहे. त्या योजना आयुक्तांनी मार्गी लावाव्यात यासाठी हे पुस्तक आहे. ते अंदाजपत्रकाचे पुस्तक नाही’, असे हेमंत रासने यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली प्रशासकांची भेट

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने आज प्रशासकांची भेट घेतली. महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडल्याने नगरसेवकांची मुदत संपलेली आहे. पण पुणेकरांच्या समस्या या प्रशासक विक्रम कुमार यांच्या माध्यमातून सुटाव्यात, नागरिकांना मदत व्हावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर, दीपक मानकर, दिलीप बराटे, सुभाष जगताप, विशाल तांबे, अश्‍विनी कदम आदी यावेळी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com