
लिंबाची किरकोळ विक्री करणार्या व्यापार्यांसाठी पर्यायी व्यवस्था करावी, बाजार समिती कडून आडते व्यापार्यांवर आकारण्यात येणारा सेस कमी करावा, तसेच गुलटेकडी मार्केटयार्डात पुणे महानगरपालिकेकडून आकारण्यात येणारा मिळकत कर रद्द करावा आदी मागण्यांचे निवेदन श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या वतीने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांना मंगळवारी देण्यात आले आहे.
मार्केट यार्ड (पुणे) : लिंबाची किरकोळ विक्री करणार्या व्यापार्यांसाठी पर्यायी व्यवस्था करावी, बाजार समिती कडून आडते व्यापार्यांवर आकारण्यात येणारा सेस कमी करावा, तसेच गुलटेकडी मार्केटयार्डात पुणे महानगरपालिकेकडून आकारण्यात येणारा मिळकत कर रद्द करावा आदी मागण्यांचे निवेदन श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या वतीने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांना मंगळवारी देण्यात आले आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
तरकारी विभागात वाहतुकीस अडथळा ठरणार्या रस्त्यावरील किरकोळ लिंबू विक्रेत्यांची पर्यायी व्यवस्था करावी. तसेच बाजार आवारातील फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा, केळी व पानाचा व्यापार करणार्या अडत्यांच्या गाळ्यावर पुणे महापालिकेकडून मिळकत कर आकारण्यात येतो. प्रत्यक्षात महापालिकेकडून बाजार आवारात कोणत्याही प्रकारच्या सुविधा पुरविल्या जात नाही. त्यामुळे, आवारात नियमित शेतमालाचा व्यापार करणार्या गाळ्यांवर आकारण्यात येणारा महापालिकेचा कर रद्द करण्यात यावा.
ऑनलाइन शाळेसाठी पालक आग्रही; मात्र शाळांचा नकार
नव्या कायद्यानुसार बाजार आवाराबाहेरील शेतमालाच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारू नये असा निर्णय घेतलेला आहे. मात्र, बाजार आवारामध्ये शेतमालाच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर सेसच्या रुपाने शुल्क घेण्याचा निर्णय कायम आहे. त्याची आकारणीही बाजार समिती प्रशासनाने करू नये. आवारात झाडलोट, साफसफाई, पाणीपुरवठा, सुरक्षा आदी सेवा पुरविणार्या बाजार समितीने सर्व सेवांच्या मोबदल्यात कराची आकारणी करावी. आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या असल्याचे अध्यक्ष विलास भुजबळ व सचिव रोहन उरसळ यांनी सांगितले.