esakal | पुणे : गणेशोत्सवात पूजेसंबंधी सेवांची मागणी ७२ टकक्यांनी वाढली
sakal

बोलून बातमी शोधा

Ganpati

गणेशोत्सवात पूजेसंबंधी सेवांची मागणी ७२ टक्क्यांनी वाढली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मूर्तिकार, मंडप करणारे, पंडित, पूजा साहित्य विक्रेते, मिठाईची दुकाने, फूल विक्रेते यांच्या मागणीमध्ये यंदा मोठी वाढ झाली होती. यासर्वात पूजेसंबंधी सेवांची मागणी गेल्या वर्षींच्या तुलनेत ७२ टक्कांनी वाढली होती. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका सर्व्हेत ही बाब नमूद करण्यात आली आहे.

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि कोल्हापुर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये मंडप, गुरुजी आणि मिठाई दुकाने यांची मागणी यावर्षी वाढली आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे असलेल्या कडक निर्बंधामुळे उत्सव साजरे करण्यावर मर्यादा होत्या. तुलनेने यंदा ही बंधने कमी असल्याने या वस्तुंची मागणीत वाढ झाली आहे. ‘जस्ट डायल’ने केलेल्या सर्व्हेमध्ये हे नमूद आहे. मंडपासाठीची मुंबईतील मागणी इतर प्रमुख शहरांच्या तुलनेत सर्वाधिक होती. नागपूर आणि पुणे दोन्हींमध्ये ही मागणी वाढली होती. मात्र पुण्यातील तात्पुरत्या दुकानांसाठीच्या मंडपाच्या मागणीने मुंबई, नाशिक आणि नागपूर यांना मागे टाकले.

हेही वाचा: आर्यन खानसह तिन्ही आरोपींना ७ ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडी

पूजा साहित्य विक्रेत्यांसाठी पुण्याने ३० टक्के मागणी वाढली. त्यानंतर नागपूर आणि कोल्हापुर या शहरांनी मागणी नोंदवली. मुंबई येथे मिठाई दुकानांची ग्राहक मागणी मोठी होती. तर पुणे, नागपूर आणि कोल्हापुर येथे सुद्धा त्यात वाढ दिसून आली.

सेवा - राज्यात वाढलेली मागणी (टक्केवारी)

  • मंडप - १२०

  • मिठाई दुकान - ११२

  • गुरुजी - ८८

  • फूल विक्रेते - ३१

  • मूर्तिकार - २५

फुलांच्या विक्रेत्यांना १०० टक्के डिमांड :

मुंबईतील फुलांच्या विक्रेत्यांची मागणी इतर सर्व शहरांपेक्षा कमी होती. मात्र पुण्यात या मागणीत थेट १०० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर नागपूरमध्ये सर्वाधिक वाढ झाली. मुर्तीकारांसाठी नागपूरमध्ये सर्वात जास्त मागणी म्हणजेच १६७ टक्के वाढ झाली. त्यानंतर मुंबईला नंबर लागला. नाशिकमध्ये मात्र ही मागणी स्थिर होती.

loading image
go to top