पुणे - महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (एससीईआरटी) घेण्यात येत असलेल्या ‘पायाभूत चाचणी परीक्षा-दोन’ (पॅट) परीक्षेची इयत्ता नववीची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी एससीईआरटीने संबंधित युट्युब चॅनलच्या चालकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. परंतु, या प्रकरणाची सखोल चौकशीही शिक्षण विभागामार्फत करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या पेट परीक्षेला सुरवात झाली आहे. या अंतर्गत इयत्ता नववीची मराठी प्रथम भाषा या परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच सोशल मिडियाद्वारे फुटली. केवळ एकाच नव्हे तर जवळपास २०हून अधिक यु-ट्युब चॅनलवर ही प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचे दिसून आले.
अर्थात, एससीईआरटीमार्फत संबंधित युट्यूब चॅनेल्सच्या चालकांविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवून कारवाईचा बडगा उगारला. परंतु, मुळात ही प्रश्नपत्रिका नेमकी फुटली कोठून याचा शोध एससीईआरटीने घेणे आवश्यक असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
संबंधित काही युट्युब चॅनेल्सवर इयत्ता नववीचा मराठी विषयाच्या पॅट परीक्षेची प्रश्नपत्रिका कशी सोडवावी, असा व्हिडिओ अपलोड करण्यात असल्याचे निदर्शनास आले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पॅट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचे उघडकीस आले.
‘पॅट परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच संबंधित युट्युब चॅनेल्सद्वारे फुटली. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. पोलिसांमार्फत कारवाई होईल, परंतु नेमकी ही प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी बाहेर आलीच कशी, याबाबत शिक्षण विभाग आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी. याशिवाय पॅट परीक्षेच्या व्यवस्थापनातील दोष आणि ढिसाळपणा यानिमित्ताने समोर येत आहेत. त्याबाबतही शिक्षण विभागाने योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे.’
- महेंद्र गणपुले, माजी उपाध्यक्ष, राज्य मुख्याध्यापक महामंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.