"जेएनयू'च्या विद्यार्थांच्या समर्थनार्थ निदर्शने 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

शुल्कवाढीच्या निर्णयासह देशातील शिक्षणव्यवस्था सुधारण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमाराच्या विरोधात विद्यार्थी संघटनांतर्फे गोपाळकृष्ण गोखले चौकात (गुडलक) रविवारी सायंकाळी निदर्शने करण्यात आली. 

पुणे  - शुल्कवाढीच्या निर्णयासह देशातील शिक्षणव्यवस्था सुधारण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमाराच्या विरोधात विद्यार्थी संघटनांतर्फे गोपाळकृष्ण गोखले चौकात (गुडलक) रविवारी सायंकाळी निदर्शने करण्यात आली. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

"मोदी सरकार हाय हाय...', "अमित शहा हाय हाय...', "देवेंद्र फडणवीस हाय हाय...', "संघ, भाजप हाय हाय', "होश में आवो, होश में आवो... मोदी सरकार होश में आवो...', "शिक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे...', "जेएनयूतील शुल्कवाढ रद्द झालीच पाहिजे...', "विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे...', "हर जोर जुल्म की, टक्कर में संघर्ष हमारा नारा है...', अशा घोषणा देण्यात आल्या. कॉंग्रेस, एनएसआययू, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, युवक क्रांती दल व संघटनांनी निदर्शनात भाग घेतला. 

कॉंग्रेसचे हनुमंत पवार म्हणाले की, विद्यापीठांमध्ये शेतकरी कुटुंबातील, दलित, अल्पसंख्याक समाजाची मुले शिकत आहेत. पण, त्यांच्या जाणिवा भाजप सरकारविरोधात आहेत. त्यामुळे जेएनयूसह अन्य विद्यापीठांमधील शुल्क वाढविले, शिष्यवृत्ती बंद केली जात आहे. त्याविरोधात जेएनयूमध्ये आंदोलन सुरू असताना विद्यार्थांना मारहाण केली. आम्ही केंद्र सरकारचा निषेध करीत असून, जेएनयूच्या विद्यार्थ्यांच्या सोबत आहोत. 

अजित पवार हाय हाय... 
भाजपशी गुपचूप हातमिळवणी करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हेदेखील आंदोलनकर्त्यांच्या घोषणाबाजीतून सुटले नाहीत. भाजप नेत्यांविरोधात घोषणाबाजी सुरू असताना "अजित पवार हाय हाय...' अशा घोषणाही देण्यात आल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demonstrations in support of JNU students