

पुणे : पावसाळ्यात डेंगीच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होते. त्यापैकी ऑगस्ट महिन्यात ही संख्या दुपटीहून जास्त झाली आहे. जुलै महिन्यात शहरात केवळ ११ रुग्ण आढळले होते, तर ऑगस्टमध्ये तब्बल २८ रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय संशयित रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढून केवळ ऑगस्टमध्येच ७४७ वर पोहोचली आहे.