महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मिळणार गती ; उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आढावा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 September 2020

कोविड-19 मुळे पुणे महापालिकेबरोबरच राज्य सरकारची ही आर्थिक कोंडी झाली आहेत. त्यामुळे शहराच्या विकासाला गती देणारे अनेक प्रकल्प किमान पाच ते दहा वर्ष लांबण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

पुणे - पुणे शहर व परिसराच्या विकासाला गती देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आता उपमुख्यमंत्री अजित पवार लक्ष घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी "प्रोजेक्‍ट मॉनिटरिंग युनिट' कक्ष स्थापन केला असून त्या माध्यमातून दर महिन्याला या प्रकल्पांचा आढावा पवार स्वत: घेणार आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहर व परिसरात राज्य सरकार पुरंदर विमानतळापासून अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. काही प्रकल्प हे महापालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहेत. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे. परंतु कोविड-19 मुळे पुणे महापालिकेबरोबरच राज्य सरकारची ही आर्थिक कोंडी झाली आहेत. त्यामुळे शहराच्या विकासाला गती देणारे अनेक प्रकल्प किमान पाच ते दहा वर्ष लांबण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यासर्व पार्श्‍वभूमी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांच्या कार्यालयात स्वतंत्र "प्रोजेक्‍ट मॉनिटरिंग युनिट' कक्ष सुरू केले आहे. महिन्यातून दोन या प्रकल्पांच्या कामकाजाचा आढावा पवार हे स्वत: घेणार आहेत. त्यामुळे हे प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मानले जात आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विशेष म्हणजे या कक्षाच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामध्ये पुरंदर विमानतळ, महामेट्रो आणि पीएमआरडीचे मेट्रो प्रकल्प, पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प, रिंगरोड, यांचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar has decided to focus on paving the way for ambitious projects