"मला बोलावताना दहा वेळा..."; अजित पवारांनी अधिकाऱ्यांना झापलं!

एकदा बारामतीत येऊन माझा गोठा पाहा, हेही त्यांना अजित पवारांनी ऐकवलं आहे.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSakal

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या सडेतोड स्वभावासाठी ओळखले जातात. अधिकाऱ्यांना सुनावणं, काम न झाल्यास कानउघडणी करणं ही त्यांची कामाची शैली आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळते. पुण्यातल्या एका कार्यक्रमातही त्यांची हीच शैली पाहायला मिळाली. पुण्यातल्या गोवंश प्रदर्शनाला अजित पवारांनी भेट देत तिथल्या अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. (Ajit Pawar in Pune)

आपण शेती आणि दूध उत्पादन क्षेत्रात आपण या आधी काम केल्याचं त्यांनी अनेकदा भाषणातून सांगितलं आहे. ते अजित पवारांनी (Deputy Chief Minister Ajit pawar) आज पुन्हा अधोरेखित केलं आहे. पुण्यातल्या कृषी महाविद्यालय इथं गोधन २०२२ देशी गोवंश प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं. तेव्हा त्यांनी तिथल्या सर्व गोठ्यांना भेट देऊन पाहणी केली. एका गोठ्यातल्या जमिनीचा स्तर समांतर नव्हता, काही ठिकाणचे बांबू तुटलेले होते. ते पाहून अजित पवारांनी अधिकाऱ्यांना झापलं.

Ajit Pawar News
कुठं फेडाल ही पापं? वर गेल्यानंतर तुम्हाला नरकातच जावं लागेल; अजित पवार संतापले

ते म्हणाले, "अरे, काय केलंय, तुम्ही मला सांगा एवढा निधी लागतो, मी तुमच्या मागण्या पूर्ण करून देतो. तुम्ही अधिकाऱ्यांनी मला बोलावताना दहा वेळा विचार करा. मी तुमचा पंचनामा करेन की कौतुक करेन. माझा काठेवाडीचा आणि बारामतीचा गोठा येऊ बघा एकदा. आवड पाहिजे, आवड असल्याशिवाय काही होत नाही".

गोठ्यांची पाहणी करताना अजित पवारांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. ते म्हणाले, "वर लाल कार्पेट आणि खाली जमिनीची लेव्हलही केली नाही. एखाद्या रानात चालतोय का काय असं वाटतंय. उगाच गोरंगोमटं होण्यासाठी काहीतरी करायचं, जरा बारामतीत या आणि काम कसं चालतंय ते बघा एकदा".

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com