उपमुख्यमंत्री अजित पवार क्वारंटाईन; कोरोना टेस्ट निगेटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

अजित पवार तीन दिवसांपुर्वी अतिवृष्टीच्या पाहणीसाठी सोलापुर दौऱ्यावर होते. त्यानंतर त्यांना थकवा जाणवू लागल्याने तातडीने कोरोना चाचणी केली मात्र, रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे आहे. मात्र, थकवा जाणवत असल्याने विश्रांतीसाठी क्वारंटाईने होण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थकवा जाणवत असल्याने सध्या क्वारंटाईन झाले आहेत. त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून निगेटिव्ह आली आहे. अजित पवार यांनी कालपासून सर्व बैठका रद्द केल्या असून पुर्वनियोजीत कार्यक्रमही रद्द केले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
अजित पवार तीन दिवसांपुर्वी अतिवृष्टीच्या पाहणीसाठी सोलापुर दौऱ्यावर होते. त्यानंतर त्यांना थकवा जाणवू लागल्याने तातडीने कोरोना चाचणी केली मात्र, रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे आहे. मात्र, थकवा जाणवत असल्याने विश्रांतीसाठी क्वारंटाईने होण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान आज राष्ट्रवादीच्या कार्यालयात होणारा जनता दरबारही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, राष्ट्रवादी नेत्यांच्या दुपारी होणाऱ्या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरंसिंग द्वारे सहभागी होणार असल्याचे समजते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar Quarantine but Corona test negative