Pune Porsche Accident : 'कितीही श्रीमंत बापाचा पोरगा असला, तरी त्याला सोडणार नाही'; कल्याणीनगर अपघातावर अजितदादांचं थेट भाष्य

पोलीस आयुक्तांवर आरोप केले तर त्याचे पुरावे देण्यात यावे.
Pune Porsche Accident Ajit Pawar
Pune Porsche Accident Ajit Pawaresakal
Updated on
Summary

'माझे देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले. देवेंद्र म्हणले मी तातडीने पुण्याला निघालो आहे. त्याच्यामध्ये स्वतः जातीनं त्यांनी लक्ष घालून त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेतली.'

धायरी : कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणी (Kalyani Nagar Hit and Run Case) उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज प्रथमच भाष्य केले.‌ कितीही श्रीमंत बापाचा पोरगा असला तरी त्याला सोडला जाणार नाही. पारदर्शक पद्धतीने काम झाले आहे. पोलीस आयुक्तांवर आरोप केले तर त्याचे पुरावे देण्यात यावे. पब संस्कृती वाढली आहे त्यावर कारवाई सुरू केली आहे, असे विधान त्यांनी केले.

मतदानानंतर ते पहिल्यादांच सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित होते. सिंहगड रोडवरील धायरी (Sinhgad Dhayari) येथे एका घड्याळ दुकानाच्या शोरूमचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. पवार म्हणाले, की पुण्यामध्ये मधल्या काळामध्ये घटना घडल्या. २१ आणि २३ मे रोजी दोन्ही दिवस सकाळी नऊ वाजल्यापासून मंत्रालयामध्ये होतो. या सगळ्या घटनेच्या संदर्भामध्ये मी लक्ष ठेवून होतो.

Pune Porsche Accident Ajit Pawar
Pune Porsche Accident: कल्याणीनगर अपघात प्रकरणी पोलिसांवरच मोठी कारवाई! दोन अधिकाऱ्यांचं निलंबन, काय आहे कारण?

माझे देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले. देवेंद्र म्हणले मी तातडीने पुण्याला निघालो आहे. त्याच्यामध्ये स्वतः जातीनं त्यांनी लक्ष घालून त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेतली. जो गुन्हा नोंदवला त्याचा लोकांनी चोथा केला. कोणाचाही हस्तक्षेप होणार नाही असे काम करायला सांगितले होते.

माझा नेहमी चुकीच्या कामाला विरोध असतो. कारण, नसताना एक अशा प्रकारचा गैरसमज समाजामध्ये करून दिला जातो की याच्यात पालकमंत्र्यांनी लक्ष घातले नाही, असे सांगून पवार म्हणाले की मला मीडियाच्या पुढे यायला आवडत नाही. मी माझे काम करत असतो. एक तर यामध्ये कुठल्याही राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप होऊन न देता कारवाई केली. ही घटना अतिशय गंभीर आहे. अशा प्रकारच्या गोष्टी कदापि घडता कामा नये, असंही त्यांनी स्पष्ट केले.

Pune Porsche Accident Ajit Pawar
Pune Porsche Accident: पोर्शेच्या अपघाताबाबत आणखी एक खुलासा, चावीसाठी आरोपीने ड्रायव्हरशी केलेलं भांडण; क्रेडिट कार्ड देखील घेतलेलं

पवार पुढे म्हणाले, राजकारण न आणता काम केले आहे. कायदा सुव्यवस्था उत्तम राखणे हे पोलीस खात्याचे काम आहे. या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली. त्याच्याबद्दल मला वेळोवेळी आयुक्त अमितेशकुमार जी काही माहिती द्यायची ते देत होते. त्यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितले. आज आम्ही दोघांनी त्याच्याबद्दलची चर्चा केली‌ त्यांनी प्रत्येक मिनिटाला कसे काय काय घडत गेले ते सांगितले.''

न्यायालयाने काय निर्णय द्यावा न्यायालयाचा प्रश्न आहे. परंतु, त्याच्या संदर्भामध्ये पुढे सगळ्या गोष्टीत ज्या काही भूमिका घ्यायला पाहिजे तशा पद्धतीने घेतल्या गेलेल्या आहेत. त्याच्यात कोणीही राजकीय हस्तक्षेप केला नाही. आमदार सुनील टिंगरे यांनी खुलासा केला आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.

Pune Porsche Accident Ajit Pawar
Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवालसह इतरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनाचा अर्ज मोकळा

आचासंहिता शिथिल करण्याची मागणी

दुष्काळी परिस्थिती आहे. २० तारखेला मीटिंग घेतली तर मतदारांना प्रलोभान दाखवले असे होईल. आचासंहिता शिथिल करा अशी मागणी केली आहे. अवकाळी पाऊस, विजा पडून मृत्यू झाले आहेत. मनुष्यहानी पण झाली आहे. याबद्दल सूचना मंत्रालय यातून देण्यात आल्या आहेत. जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर शेती काम सुरू होतील. बियाणे आहेत खते आहेत का याचा आढावा घेऊन मागणी पूर्ण करायचे काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sunetra Pawar Brings Big Gift for Baramati Announces Development Projects and Emotional Tribute to Ajit Pawar
Pravah Anathalaya founder Rameshwar Gorde honoured with Loknete Late Ajitdada Pawar Award 2026 for social service
First full size statue of Ajit Pawar in Baramati
Deputy Chief Minister Sunetra Pawar, MP Parth Pawar and Jay Pawar paid floral tributes at Ajitdada Pawar's memorial sites.
Marathi News Esakal
www.esakal.com