मुंबईतील अनुभवानंतर पुण्यात ‘नाइट लाइफ’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

मुंबईतील ‘नाइट लाइफ’च्या अनुभवानंतर पुण्यात ती लागू करायची की नाही, याबाबत भूमिका घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी स्पष्ट केले.

पुणे - मुंबईतील ‘नाइट लाइफ’च्या अनुभवानंतर पुण्यात ती लागू करायची की नाही, याबाबत भूमिका घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी स्पष्ट केले. मुंबई नाईट लाइफ सुरू झाली म्हणून तशी पुण्यात करता येणार नसून, पुणेकरांना समजूनच निर्णय घ्यावा लागेल, याकडेही पवार यांनी लक्ष वेधले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यातील पल्स पोलिओ मोहिमेचा प्रारंभ पवार यांच्या हस्ते झाला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुंबईत ‘नाइट लाइफ’ सुरू करण्याचा निर्णय पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर केला आहे. या पार्श्‍वभूमीवर पवार यांनी आपली भूमिका मांडली.

‘‘पुणेकर आणि येथील स्वयंसेवी संस्थांची ‘एनजीओ’ची भूमिका वेगळी असते. त्यामुळे तिकडे काही झाले म्हणून इकडे सुरू करता येणार नाही,’’ असे पवार यांनी सांगितले. 

अभ्यास करून बोलू 
निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये झालेल्या ‘इन्कमिंग’मुळे पक्षाचे नुकसान झाल्याच्या चंद्रकांत पाटील यांच्या कुबलीबाबत अभ्यास करून बोलेन, असे पवार यांनी सांगितले. ‘‘पाटील परवा एक बोलले आणि आता दुसरेच बोलत आहेत. त्यामुळे ते नेमके काय बोलले, हे पाहून पुढच्या दिवसांत व्यवस्थित सांगू’’, असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar on Sunday said that he would take a role night life